नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक इंडियाकडून (SBI) ग्राहकांना महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. एसबीआयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. 17 जून म्हणजेच गुरुवारी बँकेची खास सर्व्हिस ही बंद असणार आहे. एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशन सुरू आहे. त्यामुळेच ग्राहकांना दोन तास एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगचा वापर करता येणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाचे पैशाचे व्यवहार असतील तर ते लवकर आटपून घ्या असं सांगण्यात आलं आहे. आपल्या ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी वेळोवेळी मेंटेनेन्स आणि अपग्रेडेशनचं काम सुरू आहे. गुरुवारी देखील अशाच पद्धतीने अपग्रेडेशन सुरू राहील. 17 जून रोजी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत इंटरनेट बँकिंगची सुविधा बंद राहील. सिस्टीम अपग्रेडशनच्या काळात इंटरनेट बँकिंग, योनो अॅप (YONO App), योनो लाइट (YONO Lite) आणि यूपीआय (UPI) लाईट या सर्व सुविधा बंद असणार असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better banking experience.#InternetBanking#YONOSBI#YONO#ImportantNoticepic.twitter.com/hxN9ptHQy5
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 15, 2021
लवकर पूर्ण करा 'हे' काम अन्यथा पैशांचे व्यवहार करणं होईल अवघड
येत्या काळात पैशांचे व्यवहार करताना समस्या येऊ नये म्हणून बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना 30 जूनपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं, अशा सूचना दिल्या आहेत. सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवली आहे. बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे असं म्हणत बँकेने ग्राहकांनी सूचना दिली आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बंद होऊ शकतं. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे 30 जूनपूर्वी पॅन आधार लिंक करुन घ्या, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
सावधान! पैशाचे व्यवहार करताना एक चूक पडू शकते महागात; 'हा' गोष्टी टाळा#SBI#Bank#moneyhttps://t.co/I6ITZ0bDUa
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2021
SBI ग्राहकांसाठी अलर्ट! ऑनलाईन व्यवहार करताना करू नका 'हे' काम; वेळीच व्हा सावध नाहीतर...
एसबीआयने ट्विटरवर आपल्या लाखो ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार SBI ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणूक करणार्यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत. तुमचा कोणताही संवेदनशील डेटा ऑनलाईन शेअर करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करुन अॅप डाउनलोड करू नका, अशी सूचना केली आहे." एसबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही ग्राहकाने त्याची वैयक्तिक माहिती जसं की जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी यासारखी माहिती कोणसोबत शेअर करू नका.
अलर्ट! 30 जून रोजी 'ही' महत्त्वाची सुविधा होणार बंद #SBI#hdfcbank#ICICI#Bankhttps://t.co/e1BJ9wSLzw
— Lokmat (@MiLOKMAT) June 5, 2021