Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध! अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे; SBI ने ग्राहकांना दिला इशारा!

'या' मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध! अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे; SBI ने ग्राहकांना दिला इशारा!

SBI Alerts Customer about Fraud Numbers: गेल्या काही वर्षांत बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. सध्याच्या काळात लोक शाखेत जाण्याऐवजी घरी बसून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:53 PM2022-04-22T13:53:47+5:302022-04-22T14:37:10+5:30

SBI Alerts Customer about Fraud Numbers: गेल्या काही वर्षांत बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. सध्याच्या काळात लोक शाखेत जाण्याऐवजी घरी बसून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. 

sbi alerts customer about kyc fraud by these two numbers know details  | 'या' मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध! अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे; SBI ने ग्राहकांना दिला इशारा!

'या' मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध! अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे; SBI ने ग्राहकांना दिला इशारा!

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेळोवेळी फसवणुकीच्या घटनांबद्दल सतर्क ठेवते. गेल्या काही वर्षांत बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. सध्याच्या काळात लोक शाखेत जाण्याऐवजी घरी बसून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. 

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फसवणुक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क करण्यासाठी बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे.

बँकेने सायबर गुन्हेगारांच्या 91-8294710946 आणि +91-7362951973 या दोन क्रमांकांवरून सावध राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपासून गुन्हेगार या दोन नंबरवरून कॉल करतात आणि लोकांना केवायसी अपडेट करण्यास सांगतात. त्यामुळे ग्राहकांनी अशा कॉलच्या फंदात पडू नये आणि कोणत्याही प्रकारच्या फिशिंग लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे बँकेने सांगितले आहे. 

फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा...
- जर कोणी तुम्हाला कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे KYC अपडेटची माहिती पाठवत असेल, तर अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या कॉल मेसेजपासून सावध राहा.
- तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा.
- एसबीआय बँकेशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर कॉल करा.
- फसवणूक झाली तर https://cybercrime.gov.in/ या वेबसाइटवर तुमची तक्रार नोंदवा.

'या' चुका करणे टाळा
- तुमचे पर्सनल डिटेल्स आणि बँक अकाउंटची माहिती कोणाशीही शेअर करू नका
- पासवर्ड स्ट्रांग ठेवा.
- तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पिनचा पासवर्ड कुठेही लिहू नका.
- तुमचे पर्सनल डिटेल्स सोशल मीडियावर शेअर करणे टाळा.
- कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
 

Web Title: sbi alerts customer about kyc fraud by these two numbers know details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.