Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI ची जबरदस्त स्कीम, ४०० दिवसांसाठी FD करा आणि मिळवा भरपूर व्याज!

SBI ची जबरदस्त स्कीम, ४०० दिवसांसाठी FD करा आणि मिळवा भरपूर व्याज!

देशातील सर्वात मोठी सरकार बँक असलेल्या SBI नं नवी फिक्स्ड डिपॉजिट स्कीम लॉन्च केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 05:41 PM2023-03-08T17:41:12+5:302023-03-08T17:43:08+5:30

देशातील सर्वात मोठी सरकार बँक असलेल्या SBI नं नवी फिक्स्ड डिपॉजिट स्कीम लॉन्च केली आहे.

sbi amrit kalash all you need to know about the new fixed deposit option all details here | SBI ची जबरदस्त स्कीम, ४०० दिवसांसाठी FD करा आणि मिळवा भरपूर व्याज!

SBI ची जबरदस्त स्कीम, ४०० दिवसांसाठी FD करा आणि मिळवा भरपूर व्याज!

नवी दिल्ली-

देशातील सर्वात मोठी सरकार बँक असलेल्या SBI नं नवी फिक्स्ड डिपॉजिट स्कीम लॉन्च केली आहे. यात ७ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळवता येत आहे. SBI नं फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरात वाढ करण्यासोबतच नवी रिटेल एफडी स्कीम लॉन्च केली होती. या स्कीमचं नाव 'अमृत कलश जमा योजना' असं आहे. या स्कीम अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना ७.१० टक्के व्याज दिलं जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना या स्कीम अंतर्गत ७.६० टक्के व्याजाचा लाभ घेता येतो. 

३१ मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी
अमृत कलश नावाची ही योजना १५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध राहणार आहे. नवी स्कीम ४०० दिवसांनी मॅच्युअर होईल. याचा अर्थ असा की या योजनेत ग्राहकाला ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल. समजा या स्कीमममध्ये एखाद्यानं १ लाख रुपये गुंतवले तर त्याला दरवर्षी ८,०१७ रुपये व्याज स्वरुपात मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना ८,६०० रुपये दरवर्षी व्याज मिळेल. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवल्यानंतर देशातील खासगी आणि सरकारी बँका आपल्या फीक्स्ड डिपॉजिट गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्याज दरात वाढ करत आहेत. 

SBI नं FD वरील व्याज दरात केली वाढ
फेब्रुवारी महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियानं दोन कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याज जरात ५ बेसिस पॉइंट्सपासून २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. नवे व्याज दर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज दर सामान्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या व्याज दरापेक्षा २५ बेसिस पॉइंट्सनं अधिक आहेत. स्टेट बँकेनं दोन वर्ष ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आता व्याज दर ६.७५ टक्क्यांवरुन ७ टक्के इतका झाला आहे. 

१० वर्षांसाठी एफडी केली तर किती मिळणार व्याज?
बँकेनं ३ ते १० वर्षांच्या मुदत ठेवीच्या स्कीममध्ये व्याज दर ६.३५ टक्क्यांवरुन ६.५० टक्के इतका केला आहे. ७ ते ४५ दिवसांसाठीच्या मुदत ठेवीसाठी ३ टक्के इतकं व्याज मिळतं. तर ४६ ते १७९ दिवसांच्या मुदत ठेवीसाठी ४.०५ टक्के इतकं व्याज दिलं जात आहे. १८० ते २१० दिवसांच्या मुदत ठेवीसाठी ५.२५ टक्के, तर २११ ते १ वर्षापेक्षा कमी मुदत ठेवीवर ५.७५ टक्के व्याज दिलं जात आहे.  

Web Title: sbi amrit kalash all you need to know about the new fixed deposit option all details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.