Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर...

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर...

SBI : आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:33 AM2022-11-16T11:33:58+5:302022-11-16T11:35:33+5:30

SBI : आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे.

sbi atm cash withdrawal new rule sbi launched otp based cash withdrawal from atm here is process | SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर...

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर...

नवी दिल्ली : एसबीआयच्या (SBI) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने आता एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. आता एसबीआयच्याएटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे. जर तुम्ही हा नंबर टाकला नाही तर तुमची रोकड येणार नाही. दरम्यान, एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. या नियमाबद्दल जाणून घेऊया....

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमानुसार ग्राहक ओटीपीशिवाय (OTP) पैसे काढू शकत नाहीत. यामध्ये पैसे काढण्याच्या वेळी ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळतो, जो टाकल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

बँकेने या नियमाबाबत आधीही माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, 'एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध लसीकरण आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. एसबीआय ग्राहकांना ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल, याची माहिती असली पाहिजे.'

जाणून घ्या काय आहे नियम?
ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँकेने 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यावर नवीन नियम लागू केला आहे. या अंतर्गत एसबीआयच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवलेला एक ओटीपी आणि त्यांच्या डेबिट कार्डच्या पिनसह प्रत्येकवेळी आपल्या एटीएमद्वारे 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते. 

जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...
- यासाठी तुम्हाला एक ओटीपी (OTP)लागेल, त्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकणार नाही.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
- हा ओटीपी चार अंकी नंबर असेल जो ग्राहकाला सिंगल ट्रांजक्शनसाठी मिळेल.
- तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम टाकल्यानंतर तुम्हाला एटीएम स्क्रीनवर ओटीपी टाकण्यास सांगितले जाईल.
- रोख काढण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनमध्ये बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करावा लागेल.

बँकेने हे पाऊल का उचलले?
ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची गरज का आहे? या प्रश्नावर बँकेने सांगितले की, 'ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवता यावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.' दरम्यान, एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतात 71,705 बीसी आउटलेटसह 22,224 शाखा आणि 63,906 ATM/CDM चे सर्वात मोठे नेटवर्क आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अनुक्रमे 9.1 कोटी आणि 2 कोटी आहे.

Web Title: sbi atm cash withdrawal new rule sbi launched otp based cash withdrawal from atm here is process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.