Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI च्या 'या' सेवांसाठी तुम्ही पैसे देत नाही ना? ATM द्वारे अनेक कामे होतील मोफत! 

SBI च्या 'या' सेवांसाठी तुम्ही पैसे देत नाही ना? ATM द्वारे अनेक कामे होतील मोफत! 

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते, कोणताही ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (डेबिट कार्ड) वापरून अनेक प्रकारच्या मोफत सेवांचा लाभ घेऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:41 PM2022-06-03T15:41:49+5:302022-06-03T15:41:59+5:30

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते, कोणताही ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (डेबिट कार्ड) वापरून अनेक प्रकारच्या मोफत सेवांचा लाभ घेऊ शकतो.

sbi atms free provides the services cash transfer to pin change know all details here | SBI च्या 'या' सेवांसाठी तुम्ही पैसे देत नाही ना? ATM द्वारे अनेक कामे होतील मोफत! 

SBI च्या 'या' सेवांसाठी तुम्ही पैसे देत नाही ना? ATM द्वारे अनेक कामे होतील मोफत! 

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे  (State Bank of India - SBI) ग्राहक आपल्या एटीएमवर अनेक प्रकारच्या सेवा मोफत (Free Service) घेऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, देशात 60 हजारांहून अधिक एटीएम (ATM) आहेत, जे भारतातील सर्वात मोठे एटीएम नेटवर्क आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते, कोणताही ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (डेबिट कार्ड) वापरून अनेक प्रकारच्या मोफत सेवांचा लाभ घेऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व प्रकारची कार्ड्स त्यांच्या एटीएममध्ये स्वीकारली जातात.

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड वापरून झटपट मनी ट्रान्सफर (Money Transfer) करू शकता. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. याद्वारे तुम्ही कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड (SBI Debit Card), पिन नंबर आणि तुम्ही ज्या व्यक्तीला पाठवत आहात, त्याच्या डेबिट कार्डचा नंबर आवश्यक आहे.

याचबरोबर, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला भेट देऊन तुमच्या डेबिट कार्डचा पिन मोफत बदलू (ATM Pin Change) शकता. तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड नियमित अंतराने बदलण्यासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम वापरून तुमच्या खात्याची माहिती मिळवू शकता. मिनी स्टेटमेंट सेवेचा वापर करून, तुम्ही तुमच्या खात्यातील व्यवहारांचा सहज मागोवा ठेवू शकता.

या सुविधा सुद्धा मिळतात मोफत...
- तुम्ही कोणतेही स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम वापरून SBI Life Premium भरू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.
- तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून चेक बुकसाठी विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला शाखेत जाण्याचीही गरज नाही किंवा तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. 
- एसबीआय डेबिट कार्ड वापरून तुम्ही एटीएममधून सर्व प्रकारची बिले सहज भरू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

Web Title: sbi atms free provides the services cash transfer to pin change know all details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.