Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBIचा ग्राहकांना झटका, आता महागणार लॉकरची सुविधा

SBIचा ग्राहकांना झटका, आता महागणार लॉकरची सुविधा

बँक ऑफ इंडियाने सेफ डिपॉझिट लॉकरच्या वार्षिक शुल्कात 500 रुपयांची वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:34 PM2020-02-25T16:34:32+5:302020-02-25T16:41:01+5:30

बँक ऑफ इंडियाने सेफ डिपॉझिट लॉकरच्या वार्षिक शुल्कात 500 रुपयांची वाढ केली आहे.

SBI bank locker charges hike with effect from March 31 | SBIचा ग्राहकांना झटका, आता महागणार लॉकरची सुविधा

SBIचा ग्राहकांना झटका, आता महागणार लॉकरची सुविधा

Highlightsदेशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं सेफ डिपॉझिट लॉकरचं शुल्क वाढवलं आहे.बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. नव्या शुल्काची अंमलबजावणी 31 मार्चपासून होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सेफ डिपॉझिट लॉकरच्या वार्षिक शुल्कात 500 रुपयांची वाढ केली आहे.

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं सेफ डिपॉझिट लॉकरचं शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. नव्या शुल्काची अंमलबजावणी 31 मार्चपासून होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सेफ डिपॉझिट लॉकरच्या वार्षिक शुल्कात 500 रुपयांची वाढ केली आहे. एका वर्षासाठी लॉकर भाड्याने घेण्याचे शुल्क आता 2000 रुपये करण्यात आले आहे.

दुसरीकडे मोठ्या लॉकरसाठी आता ग्राहकांना 9,000 रुपयांऐवजी 12,000 रुपये मोजावे लागणार आहेत. मध्यम लॉकरसाठी ग्राहकांना वर्षाकाठी चार हजार रुपये द्यावे लागणार आहेत. मध्यम लॉकरही एक हजार रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर एका वर्षासाठी मोठ्या लॉकरचं शुल्क 2 हजार रुपयांनी वाढून त्याची वार्षिक फी 8,000 रुपये झाली आहे.
 
एसबीआय शाखा सेमी अर्बन आणि ग्रामीण भागात स्वस्त लॉकरची सेवा प्रदान करतात. त्या ठिकाणी लॉकरसाठी ग्राहकाला 1,500 ते 9,000 रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतात. एसबीआय शाखांमधल्या लॉकर चार्जमध्ये 33 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन दर केवळ मेट्रो आणि अर्बन शहरांना लागू होणार असून, यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) समाविष्ट नाही.

एवढी असेल लॉकर नोंदणी फी 
एसबीआय छोट्या आणि मध्यम आकाराच्या लॉकरसाठी 500 रुपये अधिक जीएसटी आणि एक वेळचे लॉकर नोंदणी शुल्क देखील आकारते. मोठ्या आणि अतिरिक्त मोठ्या लॉकरसाठी हे शुल्क 1000 रुपये अधिक जीएसटी एवढे आहे. जर लॉकर शुल्क भरण्यास ग्राहकांना उशीर होत असेल तर त्यांना दंड म्हणून 40% रक्कम द्यावी लागेल.

अशा परिस्थितीत असते लॉकर उघडण्याची परवानगी
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, जर ग्राहकांना वर्षभरात कमीत कमी एकदाही लॉकर न उघडल्यास बँकेला लॉकर खोलण्याची परवानगी असते. असं करण्यापूर्वी बँक आपल्याला नोटीस पाठवते. 
 

Web Title: SBI bank locker charges hike with effect from March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय