नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निधीचे व्यवस्थापन करण्याच्या जबाबदारीतून स्टेट बँक आॅफ इंडिया येत्या मार्चअखेरपर्यंत मुक्त होणार आहे. नियमानुसार एसबीआयला निधी व्यवस्थापन कंपनी म्हणून यापुढे काम करता येणार नाही. केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली.गंगवार म्हणाले की, एसबीआय म्युच्युअल फंड या कंपनीसोबत आमचे काम नाही. आम्ही एसबीआयसोबत जेव्हा करार केला, तेव्हा एसबीआय म्युच्युअल फंड अस्तित्वातच नव्हती. एसबीआय, आयसीआयसीआय सेक्युरिटीज प्रायमरी डीलरशिप, रिलायन्स कॅपिटल, एचएसबीसी एमएसी व यूटीआय एमएमसी या पाच कंपन्या ईपीएफओसाठी निधी व्यवस्थापन करतात. एक्स्चेंज रेटेड फंडांच्या व्यवस्थापनासाठी एसबीआय कॅपिटल व यूटीआय म्युच्युअल फंड्स यांची सेवा ईपीएफओ स्वतंत्रपणे घेत आहे. एसबीआय कॅपिटल्स ७५ %, तर यूटीआय म्युच्युअल फंड्स २५ % ईटीएफ निधीचे व्यवस्थापन करते.
ईपीएफओच्या निधी व्यवस्थापनातून एसबीआय मार्चमध्ये मुक्त होणार: श्रममंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 4:12 AM