देशातील सर्वात मोठी असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची मोठा फायदा मिळवून देणारी योजना बंद होणार आहे. या स्पेशल योजनेचे नाव 'अमृत कलश' आहे. या योजनेला फिक्स्ड डिपॉझिट पद्धतीने लाँच केले होते. या योजनेची शेवटची मुदत अनेकवेळा वाढवली आहे. एसबीआयच्या वेबसाईवर दिलेल्या माहितीनुसार, ४०० दिवसांच्या मुदत ठेवीवर नियमित ग्राहकांसाठी ७.१ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६ टक्के व्याज मिळते.
बाबा रामदेव यांच्या कंपनीनं दिला बंपर परतावा, शेअरचा नवा विक्रम; आता दोन वस्तूंवर वाढवणार फोकस
अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. SBI वेबसाइटनुसार, ४०० दिवसांच्या या विशिष्ट कालावधीच्या योजनेत, गुंतवणूकदारांना ७.१० टक्के व्याज मिळते जे १२ एप्रिल २०२३ पासून लागू होते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळते. ही योजना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध राहील. SBI अमृत कलश FD योजनेमध्ये शाखा, INB, YONO चॅनेलद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते आणि SBI स्पेशल FD स्कीममध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची आणि ठेव पर्यायांवर कर्ज देण्याची सुविधा देखील आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वसामान्य नागरिकांसाठी २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर ३ टक्के ते ७ टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे व्याजदर ३.५० ते ७.५० टक्के दरम्यान आहेत.
विशेष एफडी योजनेचे व्याज मुदतपूर्तीवर दिले जाते. व्याज, TDS कापल्यानंतर, ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाईल. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, मुदतपूर्व पैसे काढण्यावरील व्याज बँकेत ठेवीच्या कालावधीसाठी लागू असलेल्या दरापेक्षा ०.५० टक्के ते १ टक्के कमी असेल किंवा करार केलेल्या दरापेक्षा ०.५० टक्के किंवा १ टक्के कमी असेल.