रिलायन्स इंडस्ट्रीज संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे, रिलायन्सचे १० वर्षाचे रेकॉर्ड एसबीआयने मोडले आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी देशातील सर्वात मोठी व्हॅल्युएबल कंपनी आहे. गेली अनेक दशके सर्वात मोठी प्रॉफीटेबल कंपनी आहे.
तेल, टेलिकॉम आणि रिटेल सेक्टरमध्ये काम करणारी रिलायन्स ही देशातील प्रॉफिटेबल कंपन्यांच्या लिस्टमध्ये सर्वात वरती आहे.पण, आता त्यांच रेकॉर्ड स्टेट बँक ऑफ इंडियाने मोडले आहे.
Pepperfry च्या सीईओंचं कार्डियाक अरेस्टनं निधन, कंपनीचा येणार होता IPO
एका अहवालानुसार, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांमध्ये, SBI ने देशात सर्वाधिक नफा कमावला आहे. यात रिलायन्सला एसबीआयला फटकारावे लागले आहे. एसबीआयचा एप्रिल-जूनमध्ये 18,537 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 16,011 कोटी रुपये आहे.
'TTM' म्हणजे 'Trailing 12 Months' हा शब्द अनेकदा शेअर बाजारात वापरला जातो. याचा अर्थ असा आहे की, गेल्या 12 महिन्यांत कंपनीची कामगिरी सतत कशी आहे. याचा हिशेब केला तरी एसबीआयने रिलायन्सला मागे टाकले आहे. गेल्या 20 वर्षांत हे दुसऱ्यांदा घडले आहे, SBI ने TTM नुसार सर्वाधिक नफा कमावला आहे.
जूनमध्ये संपत असलेल्या या टीटीएमच्या आधारे एसबीआयचा एकत्रित नफा 66,860 कोटी रुपये झाला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 64,758 कोटी रुपये आहे. यापूर्वी, जुलै-सप्टेंबर 2011 मध्ये SBI चा नफा सर्वाधिक 18,810 कोटी रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीजला 18,588 कोटी रुपयांचा नफा झाला होता.