नवी दिल्ली : एसबीआय कार्डने (SBI Card) मंगळवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) सोबत मिळून 'बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन' (BPCL SBI Card OCTANE) क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. या क्रेडिट कार्डमुळे पेट्रोल-डिझेलसाठी कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.
इंधनांवर जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांची बचत करण्याच्या उद्दिष्टानेच हे कार्ड लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याव्यतिरिक्त ग्राहकांचा एलपीजी, डिपार्टमेंटल स्टोअर आणि किराणा स्टोअर्सवर खर्च केल्यानंतर अनेक फायदे आहेत. या क्रेडिट कार्डची अशी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे अशा ग्राहकांना फायदा होईल, जे पेट्रोल-डिझेलवर जास्त खर्च करतात.
या कार्ड्सवर मिळतील आणखी बरेच फायदे
एसबीआय कार्डने म्हटले आहे की, बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन, बीपीसीएल फ्यूल आणि मॅक लुब्रिकेंट, भारत गॅस (एलपीजी) वर खर्च (केवळ वेबसाइट आणि अॅपवर) आणि बीपीसीएलच्या 'इन आणि आऊट' सुविधा स्टोअरवरील खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. निवेदनात म्हटले आहे की, कार्ड अंतर्गत बीपीसीएलच्या पेट्रोल पंप स्टेशनवरील इंधन आणि ल्यूब्रिकेंटच्या खर्चात 7.25 टक्के कॅशबॅक (एक टक्का सेस सवलत समाविष्ट आहे) आणि भारत गॅसवरील खर्चावरील 6.25 टक्के कॅशबॅक उपलब्ध असणार आहे.
याशिवाय, विभागीय स्टोअर व किराणा दुकानांसह नियमित खर्चाच्या कॅटगरीतही लाभ मिळू शकेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कार्डधारक देशभरातील 17,000 बीपीसीएल पेट्रोल पंपांवर सूट घेऊ शकतात. इंधनाच्या बाबतीत कमीतकमी व्यवहाराची मर्यादा नाही. याद्वारे ग्राहक प्रत्येकवेळी इंधन खरेदीवर बचत करू शकतील.
दरम्यान, "आम्हाला ग्राहकांना उत्तम प्रोडक्ट ऑफर करायची आहेत. हे त्याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. यात त्यांना अधिक चांगले मूल्य मिळेल. देशभरात भारत पेट्रोलियमचे मोठे नेटवर्क आहे. इंधन व वंगण खरेदीवर बचत करण्याबरोबरच इतर वस्तूंच्या विक्रीतही याचा फायदा होईल", असे एसबीआय कार्डचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी कुमार तिवारी यांनी सांगितले.