Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता पिनशिवाय करा पेमेंट; 'एसबीआय कार्ड पे'वर मिळणार सुविधा 

आता पिनशिवाय करा पेमेंट; 'एसबीआय कार्ड पे'वर मिळणार सुविधा 

स्टेट बँक ऑफ इंडियानं 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा लाँच केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 08:10 PM2019-10-16T20:10:10+5:302019-10-16T20:13:34+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियानं 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा लाँच केली आहे.

sbi card launches contactless mobile payments facility | आता पिनशिवाय करा पेमेंट; 'एसबीआय कार्ड पे'वर मिळणार सुविधा 

आता पिनशिवाय करा पेमेंट; 'एसबीआय कार्ड पे'वर मिळणार सुविधा 

नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडियानं 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा लाँच केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकाला मोबाइल फोनद्वारे पॉइंट ऑफ सेल (Pos)वर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार आहे. 'एसबीआई कार्ड पे' अ‍ॅपमधून पॉइंट ऑफ सेल (Pos)वर टॅप केल्यानंतर पेमेंट होणार आहे. यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड जवळ बाळगणं आणि पिन टाकण्याची गरज लागणार नाही. 

बँकेनं सांगितलं की, भारतात हा पहिलाच प्रयोग असून, आम्ही पेमेंट सोल्युशन दिलं आहे. एसबीआय कार्ड मोबाइल अ‍ॅपचा भाग आहे. ज्या माध्यमातून ग्राहकाला बऱ्याच सुविधा मिळणार आहेत. ग्राहक क्रेडिट कार्ड अकाऊंट योग्य पद्धतीनं हाताळण्याबरोबरच कॉन्टॅक्टलेस पेमेंटही करू शकणार आहे. एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ हरदयाल प्रसाद म्हणाले, एसबीआय कार्ड ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार व्यवहार करण्याची मुभा देणार आहे. तर इतर काही अ‍ॅप ग्राहकांना 2 हजार रुपये प्रतिव्यवहार आणि दररोज 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची परवानगी देते.


एसबीआयच्या कार्ड पेचा वापर करण्यासाठी कार्डधारकाला एसबीआय कार्ड पे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करावी लागणार आहे. एकदा कार्डाचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ग्राहकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करणं सहजशक्य होणार आहे. फोन अनलॉक केल्यानंतर पॉइंट ऑफ सेल टर्मिनलच्या जवळ आणल्यास पेमेंट होणार आहे. ही सुविधा व्हिसा प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आली असून, किटकॅट व्हर्जन 4.4 अँड्रॉइट स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. एसबीआय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास 90 लाखांच्या घरात आहे. 

Web Title: sbi card launches contactless mobile payments facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय