Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI च्या बेसिक सेव्हिंग खातेधारकांसाठी कॅश काढण्याच्या, चेकबुकच्या शुल्कात बदल; पाहा नवे दर

SBI च्या बेसिक सेव्हिंग खातेधारकांसाठी कॅश काढण्याच्या, चेकबुकच्या शुल्कात बदल; पाहा नवे दर

SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी हे नवे नियम होणार लागू. हे एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर आकारलं जाणार शुल्क.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:27 PM2021-05-24T18:27:27+5:302021-05-24T18:29:59+5:30

SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी हे नवे नियम होणार लागू. हे एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर आकारलं जाणार शुल्क.

SBI cash withdrawal chequebook charges changed for basic savings account holders New rates from July 1 | SBI च्या बेसिक सेव्हिंग खातेधारकांसाठी कॅश काढण्याच्या, चेकबुकच्या शुल्कात बदल; पाहा नवे दर

SBI च्या बेसिक सेव्हिंग खातेधारकांसाठी कॅश काढण्याच्या, चेकबुकच्या शुल्कात बदल; पाहा नवे दर

HighlightsSBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी हे नवे नियम होणार लागू. हे एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर आकारलं जाणार शुल्क.

SBI Basic Savings Account Charges : SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी नवे सर्व्हिस चार्ज १ जुलै २०२१ पासून लागू करण्यात येणार आहेत. नवे दर हे एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर लागू होणार आहेत. SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांमध्ये किमान रक्कम ही शून्य ठेवण्याची आणि कमाल रक्कम ठेवण्याची कोणतीही मर्यादा नाही. SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यासह ग्राहकांना रुपे एटीएम कम डेबिट कार्डही मिळतं.

चार मोफत ट्रान्झॅक्शननंतर आता बँक शुल्क आकारणार आहे. यामध्ये ब्रान्च आणि एटीएम दोन्हीवर शुल्क आकारलं जाईल. एका महिन्यात चार वेळा मोफत ट्रान्झॅक्शनची मर्यादा संपल्यानंतर पुढील ट्रान्झॅक्शनपासून ग्राहकांकडून शुल्क आकारलं जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर ग्राहकांना १५ रूपये आणि जीएसटी असं शुल्क द्यावं लागेल. चार मोफत ट्रान्झॅक्शन्सनंतर सर्वच एटीएम आणि ब्रान्च ट्रान्झॅक्शनवर शुल्क आकारलं जाईल, असं स्टेट बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

चेकबुकसाठी शुल्क

SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी एका वर्षात १० चेक लिफ मोफत देण्यात येतील. त्यानंतर १० लीफच्या एका चेकबुकसाठी ४० रूपये आणि जीएसटी असं शुल्क आकारलं जाईल. २५ लीफच्या चेकबुकसाठी ७५ रूपये आणि जीएसटी, याशिवाय १० लिफच्या इमरजन्सी चेकबुकसाठी ५० रूपये आणि जीएसटी असं शुल्क आकारलं जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील शुल्कात सूट देण्यात आली आहे. 
 

 

Web Title: SBI cash withdrawal chequebook charges changed for basic savings account holders New rates from July 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.