Lokmat Money > बिझनेस न्यूज > समृद्धी महामार्गाला स्टेट बँकेचा वित्तपुरवठा, ‘एसबीआय’च्या अध्यक्षा भट्टाचार्य यांची माहिती

समृद्धी महामार्गाला स्टेट बँकेचा वित्तपुरवठा, ‘एसबीआय’च्या अध्यक्षा भट्टाचार्य यांची माहिती

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला स्टेट बँक आॅफ इंडिया वित्तपुरवठा करणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘लोकमत’ला दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 05:03 AM2017-10-02T05:03:14+5:302017-10-02T05:03:35+5:30

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला स्टेट बँक आॅफ इंडिया वित्तपुरवठा करणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘लोकमत’ला दिली.

SBI Chairperson Bhattacharya's information about financing of SBI | समृद्धी महामार्गाला स्टेट बँकेचा वित्तपुरवठा, ‘एसबीआय’च्या अध्यक्षा भट्टाचार्य यांची माहिती

समृद्धी महामार्गाला स्टेट बँकेचा वित्तपुरवठा, ‘एसबीआय’च्या अध्यक्षा भट्टाचार्य यांची माहिती

सोपान पांढरीपांडे
नागपूर : महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला स्टेट बँक आॅफ इंडिया वित्तपुरवठा करणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘लोकमत’ला दिली. अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रात तातडीने वित्तपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून आम्ही अशा प्रकल्पांना साहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आठशे किलोमीटर लांबीचा मुंबई-नागपूूर समृद्धी महामार्ग हा महाराष्टÑ सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी ३८००० कोटी खर्च येणार आहे. या प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालाची (डीपीआर) ची आम्हाला प्रतीक्षा आहे. डीपीआर आल्यानंतर वित्तपुरवठ्याचा तपशील आम्ही ठरवू, असे भट्टाचार्य म्हणाल्या. नागपूरच्या मेट्रो रेल्वेच्या चाचणी समारंभासाठी श्रीमती भट्टाचार्य काल नागपुरात होत्या. या वेळी त्यांनी स्टेट बँकेचे महाकार्डही जनतेसाठी सादर केले. स्टेट बँकेच्या महाकार्डमुळे सिटी बस, मेट्रो रेल्वे यांचे तिकीट विकत घेता येईलच शिवाय शॉपिंगही करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: SBI Chairperson Bhattacharya's information about financing of SBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.