नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI) ने दशकभरामध्ये जवळपास 1300 शाखांचे नाव आणि IFSC कोड बदलले असून यामुळे ग्राहकांनाही या बदलाबाबत जागरुक राहावे लागणार आहे. SBI मध्ये सहा सहकारी बँका आणि महिला बँकेचे विलिनीकरण झाल्याने हे बदल करावे लागले आहेत.
भारतीय स्टेट बँकेने या शाखांचे बदललेले नाव आणि IFSC कोडची यादी जाहीर केली आहे. एकूण 1295 शाखांची नावे बदलली आहेत. स्टेट बँकेच्या सहा सहयोगी बँक आणि महिला बँकेचे 1 एप्रिलनंतर विलिनीकरण करण्यात आले. एसबीआयने यादीमध्ये शाखांची जुनी नावे आणि आयएफएससी कोडही नमूद केले आहेत.
कोणत्या बँकेचा काय आयएफएससी कोड आहे हे एसबीआयच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. एसबीआय बचत खात्यांमध्ये जमा रकमेच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेची देशात 22,428 शाखा आहेत.