Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल

दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल

SBI Credit Card : दिवाळीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. त्यांच्या काही क्रेडिट कार्डचे नियम बदलण्यात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 02:06 PM2024-10-10T14:06:32+5:302024-10-10T14:10:46+5:30

SBI Credit Card : दिवाळीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. त्यांच्या काही क्रेडिट कार्डचे नियम बदलण्यात आले आहेत.

sbi credit card announced charge hike before diwali 2024 on these card | दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल

दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल

SBI Credit Card : सध्या नवरात्री सुरू असून या महिन्यात दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सणही येणार आहेत. सणासुदीच्या काळात कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादनांवर भरघोस सूट देत असतात. ई कॉमर्स कंपन्या तर खास फेस्टीवल सिझन जाहीर करतात.  या कालावधीत बहुतेक बँका देखील त्यांच्या क्रेडिट कार्डांवर विशेष ऑफर देतात. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, एसबीआयने सणासुदीच्या काळात त्यांच्या काही क्रेडिट कार्ड वापरण्याचे नियम बदलले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या काही SBI क्रेडिट कार्डवरील शुल्कात वाढ केली आहे. यामध्ये युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसचा समावेश आहे. अशा परिस्थितीत बदलेले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत.

युटिलिटी बिल पेमेंट शुल्क
बिलिंग कालावधी दरम्यान एकूण युटिलिटी पेमेंट रक्कम ५०००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला आता १ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. युटिलिटी बिल पेमेंटवरील हा बदल १ डिसेंबर २०२४ पासून लागू होईल. युटिलिटी बिल पेमेंटमध्ये टेलिफोन, मोबाईल, वीज बिल आणि विमा प्रीमियम यांचा समावेश आहे.

फायनान्स चार्ज
SBICard ने सर्व असुरक्षित क्रेडिट कार्ड्सवरील फायनान्स चार्ज ३.७५% प्रति महिना केला आहे. हा नियम डिफेन्ससाठी लागू होत नाही. हा सुधारित नियम दिवाळीनंतर म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल.

Web Title: sbi credit card announced charge hike before diwali 2024 on these card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.