Join us

SBI चा कोट्यवधी क्रेडिट कार्ड ग्राहकांना झटका; 1 एप्रिलपासून लागू होणार हा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 6:41 PM

SBI Credit Card Reward Point: एसबीआयने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे.

SBI Credit Card Reward Point: स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ने आपल्या कोट्यवधी क्रेडिट कार्ड ग्राहकांना धक्का दिला आहे. SBI कार्डने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. हे नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील. या नवीन नियमानुसार, SBI क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट केल्यावर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. 1 एप्रिलपासून ठराविक क्रेडिट कार्डांवर हा नियम लागू होईल, तर 15 एप्रिल 2024 पासून उर्वरित कार्ड्सवर लागू होईल.

1 एप्रिल 2024 पासून या SBI कार्डांद्वारे रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत

  • ऑरम एसबीआय कार्ड
  • एलाईट एसबीआय कार्ड
  • एलाईट अॅडव्हान्टेज एसबीआय कार्ड
  • पल्स एसबीआय कार्ड
  • सिंप्ली क्लिक अॅडव्हान्टेज कार्ड
  • एसबीआय कार्ड प्राइम ॲडव्हांटेज
  • एसबीआय कार्ड प्लॅटिनम
  • एसबीआय कार्ड प्राइम प्रो
  • एसबीआय कार्ड शौर्य सिलेक्ट
  • एसबीआय कार्ड प्लॅटिनम ॲडव्हान्टेज
  • डॉक्टर एसबीआय कार्ड
  • गोल्ड एसबीआय कार्ड
  • गोल्ड क्लासिक एसबीआय कार्ड
  • गोल्ड डिफेन्स एसबीआय कार्ड
  • कर्नाटक बँक एसबीआय कार्ड 
  • अलाहाबाद बँक एसबीआय कार्ड

15 एप्रिल 2024 पासून या SBI कार्डांद्वारे रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत

  • एअर इंडिया प्लॅटिनम कार्ड
  • एअर इंडिया सिग्नेचर कार्ड
  • आदित्य बिर्ला एसबीआय कार्ड
  • बीपीसीएल एसबीआय कार्ड
  • आयआरसीटीसी एसबीआय कार्ड
  • फॅब इंडिया एसबीआय कार्ड
  • क्लब विस्तारा एसबीआय कार्ड
  • सेंट्रल एसबीआय कार्ड 

वरील कार्ड्सशिवाय SBI चे इतर काही कार्ड्स आहेत, ज्यावर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

टॅग्स :एसबीआयबँकबँकिंग क्षेत्र