Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI Alert : एसबीआयच्या ग्राहकांना अलर्ट, उद्या रात्रीपासून बंद राहणार बँकेच्या महत्त्वाच्या सेवा, खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या...

SBI Alert : एसबीआयच्या ग्राहकांना अलर्ट, उद्या रात्रीपासून बंद राहणार बँकेच्या महत्त्वाच्या सेवा, खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या...

SBI Customer Alert : बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती जारी केली असून बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा (SBI Services) उद्या बंद राहणार असल्याचे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 06:50 PM2021-12-10T18:50:19+5:302021-12-10T18:51:20+5:30

SBI Customer Alert : बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती जारी केली असून बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा (SBI Services) उद्या बंद राहणार असल्याचे म्हटले आहे.

SBI Customer Alert! Online Banking Services To Remain Shut Tomorrow | SBI Alert : एसबीआयच्या ग्राहकांना अलर्ट, उद्या रात्रीपासून बंद राहणार बँकेच्या महत्त्वाच्या सेवा, खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या...

SBI Alert : एसबीआयच्या ग्राहकांना अलर्ट, उद्या रात्रीपासून बंद राहणार बँकेच्या महत्त्वाच्या सेवा, खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या...

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (SBI) आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना (SBI Important Notice) दिली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना अलर्ट  (SBI Customers Alert) केले असून आपल्या गरजेनुसार बँकेशी संबंधित कामे अगोदरच निपटून घेण्याचे आवाहन केले आहे. 

बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती जारी केली असून बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा (SBI Services) उद्या बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवा ग्राहकांसाठी शनिवार-रविवार रात्री 11.30 ते सकाळी 4.30 पर्यंत नसेल. त्यामुळे तुम्ही 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी तुमची ऑनलाइन बँकिंग कामे पूर्ण  करावीत. 

ट्विटद्वारे बँकेकडून माहिती
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. यात म्हटले आहे, "आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की, त्यांनी आमच्यासोबत राहावे कारण आम्ही एक उत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत." तसेच, बँकेने पुढे म्हटले आहे की, "आम्ही 11 डिसेंबर 2021 ला रात्री 11.30 ते पहाटे 4:30 (300 मिनिटे) पर्यंत टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनचे काम करणार आहोत. त्यामुळे यावेळेत INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI या ऑनलाइन बँकिंग सेवा उपलब्ध नसतील. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत."

एसबीआयचे सर्वात मोठे नेटवर्क
दरम्यान, एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा आठ कोटींहून अधिक लोक वापरतात आणि मोबाईल बँकिंग जवळपास दोन कोटी लोक वापरतात. त्याच वेळी, योनोवर रजिस्टर्ड ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन  करतात. तसेच, एसबीआयचे देशभरात 22,000 पेक्षा जास्त शाखा आणि 57,889 पेक्षा जास्त एटीएम असलेले सर्वात मोठे नेटवर्क आहे.
 

Web Title: SBI Customer Alert! Online Banking Services To Remain Shut Tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.