Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI ग्राहकांनो लक्ष द्या! आज रात्री 7 तास 'ही' सर्व्हिस बंद राहणार, जाणून घ्या डिटेल्स

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! आज रात्री 7 तास 'ही' सर्व्हिस बंद राहणार, जाणून घ्या डिटेल्स

sbi customer alert : एसबीआय (SBI)बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 04:20 PM2022-02-26T16:20:35+5:302022-02-26T16:23:14+5:30

sbi customer alert : एसबीआय (SBI)बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

sbi customer alert services to be hampered due to maintenance on february 26 and 27 night check details here | SBI ग्राहकांनो लक्ष द्या! आज रात्री 7 तास 'ही' सर्व्हिस बंद राहणार, जाणून घ्या डिटेल्स

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! आज रात्री 7 तास 'ही' सर्व्हिस बंद राहणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) म्हणजेच एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी आपले पोर्टल अपडेट करत असते. 

दरम्यान, एसबीआय (SBI)बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने म्हटले आहे की, कंप्लेंट सर्व्हिस पोर्टल 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी काही तासांसाठी उपलब्ध नसणार आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे डिजिटल व्यवहार करायचे असतील तर ते लवकर पूर्ण करावे लागतील.

एसबीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ग्राहकांना कळवले आहे की, आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना आमच्यासोबत राहण्याची विनंती करतो कारण आम्ही अधिक चांगला बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. तसेच, बँकेने म्हटले आहे की बँकेच्या कंप्लेंट पोर्टल http://crcf.sbi.co.in ची सर्व्हिस 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार नाही. दरम्यान, बँकेच्या म्हणण्यानुसार, या काळात ग्राहक कोणत्याही प्रकारची तक्रार, चौकशी इत्यादींसाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांक 1800112211/18001234/18002100 वर संपर्क करू शकतात.

देशातील सर्वात मोठी बँक
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, ही एक चतुर्थांश मार्केट शेअर असलेली देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयने आपल्या 11 उपकंपन्यांद्वारे एसबीआय जनरल इन्शुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एसबीआय म्युच्युअल फंड, एसबीआय कार्ड इत्यादीसारख्या विविध व्यवसायांमध्ये यशस्वीरित्या विविधता आणली आहे.
 

Web Title: sbi customer alert services to be hampered due to maintenance on february 26 and 27 night check details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.