Lokmat Money > बिझनेस न्यूज > सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक?

सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक?

sbi customers : एसबीआयच्या ग्राहकांना सावध करणारा एक संदेश बँकेने पाठवला आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:03 IST2025-02-28T17:01:49+5:302025-02-28T17:03:29+5:30

sbi customers : एसबीआयच्या ग्राहकांना सावध करणारा एक संदेश बँकेने पाठवला आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

sbi customers are facing a big threat the bank has issued a warning cyber fraud 2025 | सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक?

सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक?

sbi customers : वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. सरकारने थेट कॉलरट्यूनद्वारे जनजागृती सुरू केली आहे. आरबीआयसह बँकाही वारंवार सूचना देत असतात. मात्र, त्यानंतरही ग्राहकांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार सुरुच आहेत. तुम्ही जर भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, बँकेनेच आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहेत. वास्तविक, स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी आपल्या ग्राहकांना एक संदेश पाठवला आहे. या संदेशाद्वारे बँकेने आपल्या ग्राहकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट मॅसेज
आपल्या ग्राहकांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होऊ नये यासाठी एसबीआयने शुक्रवारी एक संदेश पाठवला. यामध्ये आपल्या ग्राहकांना टेक्स्ट मॅसेजद्वारे सायबर फसवणुकीसाठी गुन्हेगारांकडून अवलंबल्या जाणाऱ्या डावपेचांचा इशारा दिला आहे. एसबीआयने मेसेजमध्ये लिहिले आहे की, “प्रिय SBI ग्राहक, सायबर गुन्हेगार SBI रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्यासाठी मोबाईल फोनवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा कोणत्याही नंबरवर कॉल करून एसएमएस पाठवत आहेत. हा एक स्कॅम आहे, अशा एसएमएसला प्रतिसाद देऊ नका.

SBI ग्राहकांना फसवण्यासाठी ट्रॅप?
देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशाच्या विविध भागात सक्रिय असलेले गुन्हेगार निरपराध लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या आणि नवनव्या युक्त्या वापरत आहेत. गुन्हेगार आता एसबीआयच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. यासाठी ग्राहकांना एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्याचे आमिष दाखवत आहेत. तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि SBI रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्यासाठी कोणीतरी फोन कॉल किंवा मेसेजद्वारे तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यास, सावध व्हा. सायबर फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. पण हे टाळण्यासाठी तुम्हाला स्वतःला सतर्क राहावे लागेल.

Web Title: sbi customers are facing a big threat the bank has issued a warning cyber fraud 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.