Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्याचे आवाहन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:25 AM2022-05-04T10:25:27+5:302022-05-04T10:26:23+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्याचे आवाहन केले आहे.

sbi customers can invest in lic ipo through yono app know all details | SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या

नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC चा सर्वांत मोठा IPO आजपासून खुला झाला आहे. १७ मे रोजी एलआयसीचा शेअर लिस्टिंग होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आयपीओ घेण्यासाठी लाखो गुंतवणूकदार सज्ज झाले आहेत. याशिवाय, बँकांसह अनेक कंपन्या गुंतवणूकदारांसाठी नवनवीन सुविधा आणत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्यास सांगितले आहे. 

एलआयसीचा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास कोण पात्र आहेत आणि यात गुंतवणूक कशी करायची या गोष्टींवरून सध्या चर्चा सुरु आहे. यासाठी गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे याबाबत याआधीही कळवण्यात आले आहे. एसबीआयने एक ट्विट करत योनो अॅपच्या माध्यमातून डिमॅट आणि ट्रेडिंग खाते सुरू करण्याची सुविधा सुरू केली आहे. 

तुमचा गुंतवणुकीचा प्रवास आजच सुरू करा!

एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमचा गुंतवणुकीचा प्रवास आजच सुरू करा! एसबीआयने सांगितले की, योनोवर तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा, यासाठी तुम्हाला कोणताही ओपनिंग चार्ज लागणार नाही तसेच डीपी एमसी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षासाठी विशेष सूट दिली जाईल. यापूर्वी एसबीआयने एसबीआय सिक्युरिटीज डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याद्वारे एलआयसी आयपीओ गुंतवणुकीसाठी समान अधिसूचना जारी केली होती. तथापि, गुंतवणूक सुरू करण्यासाठी, ग्राहकांना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे एसबीआयने सांगितले आहे.

दरम्यान, एलआयसी आयपीओ ४ मे २०२२ ला लॉंच करेल आणि ते ९ मे २०२२ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असेल. २ मे २०२२ रोजी अँकर आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उघडण्यात आला आहे. या आयपीओमध्ये २०,५५७ कोटी रुपयांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे, जिथे केंद्र सरकार आपला ३.५ टक्के हिस्सा विकणार आहे. या अंतर्गत, एकूण २२.१० कोटी इक्विटी शेअर्स ऑफर केले जातील.
 

Web Title: sbi customers can invest in lic ipo through yono app know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.