Join us

Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:15 AM

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला असून वेळीच सावध केले आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये घरबसल्या डिजीटल व्यवहारांना पसंती दिली जात असून ते मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. मात्र याच दरम्यान दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण हे वाढले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला असून वेळीच सावध केले आहे. 

एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. फसवणुकीबाबत लोकांना सावधान केले आहे. एसबीआयने आपल्या खातेधारकांना संभाव्य सायबर हल्ल्याबाबत इशारा दिला आहे. कोरोनाच्या नावाने फेक ईमेल पाढवून त्यांची वैयक्तित माहिती चोरली जाण्याची शक्यता आहे. तसेच सोशल मीडिया पोस्ट्स किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे ग्राहकांना लक्ष्य केले जाऊ शकते असा इशारा बँकेने दिला आहे. फ्री कोरोना टेस्ट असा ईमेल करण्यात येत असून याद्वारे ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने "21 जूनपासून देशातील काही मुख्य शहरांमध्ये मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला CERT-In कडून मिळाली आहे. यासाठी ncov2019@gov.in या ईमेल आयडीद्वारे ‘फ्री कोविड19 टेस्टिंग’बाबतचा मेल पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी ncov2019@gov.in मेल आयडीवरुन आलेल्या मेलवर क्लिक करु नये" अशी माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. तसेच दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई येथील ग्राहकांना याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना बँकेकडून देण्यात आल्या आहेत.

"सायबर गुन्हेगारांकडे जवळपास 20 लाख भारतीयांचे ईमेल आयडी आहेत. त्या सर्व इमेल आयडीवर सायबर हल्लेखोर ‘Free Covid-19 Testing’ या विषयाचा मेल पाठवू शकतात. कोविड-19 च्या नावाखाली बनावट इमेल पाठवून त्याद्वारे हे सायबर हल्लेखोर लोकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरी करत आहेत. त्यामुळे सावध राहा" असं एसबीआयने म्हटलं आहे. याआधी एसबीआयने काही भामटे बँक अधिकारी बनून ग्राहकांना फसवत असल्याचं म्हटलं होतं. ग्राहक आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुठे तक्रार नोंदवू शकतात याबाबत बँकेने माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

CoronaVirus News : पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार! रामदेव बाबा आज करणार लाँच

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

India China Faceoff : भारताला लुबाडण्यासाठी चीनची 'नवी चाल'; 'या' आवश्यक वस्तूंचे वाढणार भाव 

ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल 

 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियासायबर क्राइमभारतबँक