नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) बचत खात्यावरील व्याजदर कपातीच्या निर्णयाचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार समर्थन केले. कर्जावरील व्याजदरात सध्या नरमाईचा कल सुरू आहे. एसबीआयचा निर्णय त्याला अनुसरूनच आहे, असे जेटली यांनी राज्यसभेत सांगितले.
एसबीआयने १ कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यावरील व्याजदर नुकताच ४ टक्क्यांवरून ३.५ टक्के केला आहे. राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यावर जेटली म्हणाले की, कर्जावरील व्याजदरांचा सध्याचा कल लक्षात घेता हा निर्णय योग्यच आहे. ज्येष्ठ नागरिकांना मिळणाºया व्याजदराचे संरक्षण करण्यासाठी सरकारने आधीच एक ठेव योजना आणली आहे. या योजनेत ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर मिळण्याची हमी आहे.
जेटली म्हणाले की, जेव्हा महागाईचा दर १0 ते ११ टक्के होता, तसेच जेव्हा अर्थव्यवस्थेत साचलेपण आलेले होते, तेव्हा बचत आणि ठेवींवर उच्च व्याजदर दिले जात होते. जेव्हा कर्जावरील व्याजदर कमी होतात, तेव्हा बचतीवरील व्याजदरही कमी होतात. ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त व्यक्तींसाठी सरकारने निवृत्तीवेतन योजना आणली आहे. या योजनेत ८ टक्के व्याजदर मिळण्याची हमी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री व्यय वंदना योजना (पीएमव्हीवायवाय) योजनेची गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घोषणा केली होती. ही योजना मे महिन्यात सुरू झाली. या योजनेचा प्रभावी व्याजदर ८.३ टक्के आहे. ही योजना एलआयसीकडून चालविण्यात येते.
शून्य प्रहारात विरोधी
पक्षांनी अर्थव्यवस्थेतील नरमाईवर तसेच बेरोजगारीवर चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यावर जेटली म्हणाले की, विरोधकांनी सभागृह दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू दिल्यास विरोधकांच्या मागणीप्रमाणे सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते.
कर्ज घ्यायला कोणी नाही?-
तृणमूल काँग्रेसचे सदस्य डेरेक ओब्रिएन यांनी शून्य प्रहरात एसबीआयच्या व्याजदर कपातीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले की, नोटाबंदीमुळे १.५ लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले आहेत. कर्ज घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे व्याजदरात कपात करण्यात आल्याचे एसबीआयने म्हटले आहे.
एसबीआयची व्याजदर कपात योग्यच; अर्थमंत्री जेटली यांची राज्यसभेत स्पष्टोक्ती
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) बचत खात्यावरील व्याजदर कपातीच्या निर्णयाचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार समर्थन केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:08 AM2017-08-04T01:08:26+5:302017-08-04T01:08:32+5:30