Join us

मुदत ठेवींवरील व्याजदरात एसबीआयने केली मोठी कपात, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:48 PM

मुदत ठेवींवरील व्याजदराबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - मुदत ठेवींवरील व्याजदराबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या ठेवींवरील व्याजदरात एसबीआयकडून तब्बल 0.75 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2019 पासून करण्यात येणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे.  सोमवारी प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात एसबीआयकडून सांगण्यात आले की, अल्पमुदतीच्या 179 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याज दरात 0.5 ते 075 टक्क्यांनी कपात करण्यात आळी आहे. त्याचप्रमाणे दीर्घ मुदतीच्या ठेवींवर  रिटेल विभागातील व्याजदरात 0.20 आणि बल्क विभागातील व्याजदरात 0.35 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या या बँकेने दोन कोटी रुपये आणि त्यावरील ठेवींवरील व्याजदरातसुद्धा कपात केली आहे.  

एसबीआयकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यात आल्याने गुंतवणुकदारांना धक्का बसला आहे. याआधी केंद्र सरकारने एनपीएस, किसान विकास पत्र आणि पीपीएफसारख्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली होती. तर जून महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर विविध बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली होती.  

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाबँकिंग क्षेत्रभारतअर्थव्यवस्था