नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेण्डिंग रेट्स) आधारित व्याजदर कमी केल्याची माहिती मिळत आहे. बँकेने कर्जावरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर 8.25 टक्क्यांवरून 8.15 टक्के झाला आहे. 10 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
एसबीआयने 2019-20 या आर्थिक वर्षात पाचव्यांदा व्याजदरात कपात केली आहे. कमी व्याज दर आणि बँकेकडे असलेली रोख रक्कम यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने रिटेल डिपॉजिटवरील दरांमध्ये 0.20 वरून 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. तसेच बल्क टर्म डिपॉजिट दरामध्ये 0.10 वरून 0.20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
State Bank of India (SBI) has announced a reduction in its Marginal Cost of Funds-based Lending Rate (MCLR) by 10 basis points (bps) across all tenors. The 1 Year MCLR would come down to 8.15% p.a. from 8.25% p.a. with effect from 10 September, 2019. pic.twitter.com/f9yJOBigM6
— ANI (@ANI) September 9, 2019
स्टेट बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं होतं. एसबीआयने वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी (Processing Fees Wave Off) शून्य केली. त्यामुळे वाहन कर्ज घेणार असल्यास वाहन कर्जा(Auto Loan)वर प्रोसेसिंग फीच्या नावे कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच बँकेचं पर्सनल लोन (Personal Loan) आणि एज्युकेशन लोन (Education Loan)चा परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवला आहे. आता 6 वर्षांसाठीही पर्सनल लोन घेऊ शकता.
- SBI वसूल करणार नाही प्रोसेसिंग फीस- बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, SBIनं फेस्टिव्ह सीझन लक्षात घेता वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फीस संपुष्टात आणली आहे. बँकेत सद्यस्थितीत वाहन कर्जावर 8.70 टक्के व्याजदर आकारला जातो. तसेच वाहन कर्ज डिजिटल माध्यम म्हणजेच YONO किंवा बँकेच्या वेबसाइटच्या माध्यमातून घेतल्यास 0.25 टक्के सूट मिळते. बँक सॅलरीच्या माध्यमातून ग्राहकाला वाहनाच्या किमतीवर 90 टक्के कर्ज मिळतं.
- काय असते प्रोसेसिंग फीस- आपण कोणतंही कर्ज घेण्यासाठी अर्ज केल्यास बँक आपल्याकडून प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फीस वसूल करते. पर्सनल लोनसाठीही दोन पर्याय उपलब्ध असतात. एका प्रकारात आपल्याला प्रोसेसिंग फीस द्यावी लागते. त्याशिवाय आपल्याला इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रांची पूर्तता करावी लागेत. पर्सनल लोनवर प्रोसेसिंग फीसच्या माध्यमातून 2-3 टक्के चार्ज वसूल केला जातो.
- घेऊ शकता 20 लाखांपर्यंतचं वैयक्तिक कर्जः SBIच्या फेस्टिव्ह सीझनच्या पार्श्वभूमीवर 20 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज मिळते. त्यासाठी बँक आपल्याकडून 10.75 टक्के व्याजदर वसूल करते. SBIनं परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवून 6 वर्षांचा केला आहे. त्यामुळे ग्राहकांवरचा EMIचा भार काहीसा कमी होणार आहे.
- एज्युकेशन लोनसंदर्भात घेतला मोठा निर्णयः जर आपल्याला परदेशात शिकण्यास जाण्याची इच्छा असल्यास आता एसबीआयचं एज्युकेशन लोन फायदेशीर ठरणार आहे. 50 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्जावर एसबीआय 8.25 टक्के व्याजदर वसूल करते. बँकेनं परतफेड कालावधी(Repayment Tenure) वाढवून 15 वर्षांचा केला आहे.