मुंबई : किंगफिशर समुहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या हे कर्ज बुडवे (विलफुल डिफॉल्टर - स्वेच्छेने कर्ज बुडविणारे) असल्याचे स्टेट बँकेने घोषित केले. या संदर्भात स्टेट बँकेतर्फे लवकरच विजय मल्ल्या यांच्यावरील या कारवाईची माहिती भारतीय रिझर्व्ह बँक आणि क्रेडिट इन्फोर्मेशन ब्युरोला देणार असून त्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी मल्ल्या यांना कोेणत्याही प्रकारे निधी उभारणे शक्य होणार नाही.
२०१२ पासून मृतावस्थेत असलेल्या किंगफिशर एअरलाईन्सने १७ बँकांच्या एकत्रित मंचाचे सुमारे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविले. यामध्ये सर्वात मोठा १६०० कोटी रुपयांचा वाटा हा स्टेट बँक आॅफ इंडियाचा आहे. या कर्जासाठी तारणापोटी दिलेल्या समभागांची, मालत्तांची विक्री करून वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, तरीही कर्ज फिटले नाही.
किंगफिशर एअरलाईन्स व युनायटेड बेव्हरेज या त्यांच्या दोन्ही कंपन्यांना स्वेच्छेने कर्ज बुडवे म्हणून घोषित केले आहे. गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये स्टेट बँकेने मल्ल्या यांना नोटिस पाठविली होती. मात्र, मल्ल्या यांनी स्वत: उपस्थित न राहता त्यांच्या वकीलाला उपस्थित राहण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. ती त्यांना देण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बँकेने ही कारवाई केली.
एसबीआयकडून विजय मल्ल्या कर्जबुडवे घोषित
किंगफिशर समुहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या हे कर्ज बुडवे (विलफुल डिफॉल्टर - स्वेच्छेने कर्ज बुडविणारे) असल्याचे स्टेट बँकेने घोषित केले. या संदर्भात स्टेट बँकेतर्फे लवकरच
By admin | Published: November 18, 2015 03:21 AM2015-11-18T03:21:55+5:302015-11-18T03:21:55+5:30