Join us  

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! नवी योजना होणार सुरू, खातेधारकांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:49 PM

SBI 'IRIS Scanner' ओळख सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.

SBI : जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. SBI कडून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना लवकरच एक नवीन सुविधा दिली जाणार आहे. तुमच्या घरातील वृद्धांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. बँकेच्या नवीन नियोजनांतर्गत, ग्राहकाची ओळख बँकिंग एक्झिक्युटिव्ह किंवा कस्टमर केअर सेंटरच्या माध्यमातून करता येते. SBI कडून 'IRIS Scanner' ही ओळख सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे.

Mukesh Ambani : आता 'रिलायन्स'चे कॉफी शॉप; टाटांच्या 'स्टारबक्स'ला अंबानी टक्कर देणार

बँक एक्झिक्युटिव्हजवळ 'आयआरआयएस स्कॅनर'च्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना गृह शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. या सुविधेनंतर, ते त्यांच्या जवळच्या 'बँक मित्र' केंद्रातूनच पेन्शन काढू शकतील. एसबीआयच्या एका निवेदनात असे म्हटले आहे की ते त्यांच्या 'बँक मित्रा' ऑपरेटरसह 'आयरिस स्कॅनर' स्थापित करण्याच्या पर्यायाची चाचणी घेत आहे. 

'आयआरआयएस स्कॅनर'च्या मदतीने डोळ्यांच्याद्वारे कोणत्याही व्यक्तीची ओळख पटवली जाऊ शकते. सध्या सर्वच कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्यासाठी अशीच सुविधा वापरली जाते. अलीकडेच ओडिशातील नवरंगपूर जिल्ह्यातील एक वृद्ध महिला तिची पेन्शन काढण्यासाठी एका बँक मित्राकडे गेली होती. इथे तिच्या बोटांची पुष्टी होत नसल्याने त्यांना खूप त्रास झाला. अशी परिस्थिती टाळण्यासाठी डोळे स्कॅनर बसवण्याची शक्यता पडताळून पाहिली जात असल्याचेही बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :एसबीआयबँक