नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं पुन्हा एकदा ग्राहकांसाठी मोफत पेट्रोल मिळवण्याची योजना उपलब्ध करून दिली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास ग्राहकाला 5 लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं या आधीही अशी योजना ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. तीच योजना आता पुढे सुरू ठेवण्यात आली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप बनवले आहे, जे यूपीएवर काम करते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 100 रुपयांचे पेट्रोल भरावे लागणार आहे. त्यानंतर, भीम अॅपद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. मग, तुमचा नंबर सिलेक्ट झाल्यास तुम्हाला एसबीआयकडून तसा मेसेज येईल. त्यामुळे तुम्ही 5 लिटर मोफत पेट्रोल योजनेसाठी पात्र ठरणार आहात. या योजनेंतर्गत एका दिवसाला 10 हजार ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत जिंकण्याची संधी आहे.
15 डिसेंबरपर्यंत मुदत- एसबीआयनं 5 लीटर मोफत पेट्रोलची ही योजना 19 नोव्हेंबरला लाँच केली होती. 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत ही योजना सुरूच होती. परंतु एसबीआनं या ऑफरची मुदत वाढवली आहे. आता तुम्ही या ऑफरचा फायदा 15 डिसेंबरपर्यंत घेऊ शकता. 15 डिसेंबरपर्यंत भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास ग्राहकाला 5 लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे.
SBIची पुन्हा भन्नाट ऑफर! आजच्या दिवसात मिळवा 5 लीटर मोफत पेट्रोल
स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं पुन्हा एकदा ग्राहकांसाठी मोफत पेट्रोल मिळवण्याची योजना उपलब्ध करून दिली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 09:04 AM2018-12-15T09:04:30+5:302018-12-15T09:07:20+5:30
स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं पुन्हा एकदा ग्राहकांसाठी मोफत पेट्रोल मिळवण्याची योजना उपलब्ध करून दिली आहे.
HighlightsSBIनं पुन्हा एकदा ग्राहकांसाठी मोफत पेट्रोल मिळवण्याची योजना उपलब्ध करून दिली.इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कुठल्याही पेट्रोल पंपावर भीम अॅपद्वारे करा व्यवहार अन् मिळवा 5 लिटर मोफत पेट्रोल योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 100 रुपयांचे पेट्रोल भरावे लागणार