स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे. आपले खातेही SBI मध्ये असेल, तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे. बँकेने फिक्सड डिपॉझिटच्या व्याजदरात (FD Interest Rates) पुन्हा एकदा वाढव केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, पब्लिक सेक्टरमधील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) 2 कोटी आणि याहून अधिकच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
10 मेपासून लागू झाले आहेत नवे दर -
बँकेकडून वाढवण्यात आलेले हे दर 10 मेपासून लागू झाले आहेत. मात्र, बँकेने शॉर्ट टर्म फिकस्ड डिपाझिटवरील व्याज दरात (7 ते 45 दिवस) वाढ केलेली नाही. बँकेकडून 46 ते 149 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 50 बेसिस पॉइंट व्याज वाढविण्यात आले आहे. तर, एक वर्षाहून अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमीच्या ठेवींवर 40 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
5 ते 10 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज -
दोन वर्षांपेक्षा अधिक आणि तीन वर्षांपेक्षा कमीच्या ठेवींवरील व्याज दरावर 65 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. याच प्रकारे तीन ते पाच वर्ष आणि 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज वाढविण्यात आले आहे. या दोन्ही प्रकारच्या एफडीवर आता ग्राहकांना 4.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल. यापूर्वी हा व्याजदर 3.6 टक्के एवढा होता.