लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यापूर्वीच्या कृषी कर्जमाफीमुळे भविष्यातील कर्जाच्या परतफेडीवरही परिणाम होत असल्याचे मत, देशातील सर्वात मोठ्या असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने व्यक्त केले आहे. कर्जमाफीमुळे राज्यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही बँकेने म्हटले आहे.
एसबीआयने म्हटले की, देशात उदय योजनेंतर्गत वीज बोर्डातील कर्जांचे पुनर्गठन करण्यात येत आहे. परिणामी महसुली तोटा वाढत आहे. याबाबतच्या अहवालात म्हटले की, राज्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम १.३१ लाख कोटी आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ३६,३५९ कोटी, तर महाराष्ट्रातील ३० हजार कोटींच्या कर्जमाफीचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब या राज्यांची रक्कमही मोठी आहे.
स्टेट बँकेचे अर्थतज्ज्ञ सौम्या कांती घोष यांनी म्हटले की, कर्ज परतफेड संस्कृतीवरच नकारात्मक परिणाम होत आहे. यूपीए सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर आर्थिक वर्ष २००९ च्या एनपीएत घट झाली. यापूर्वी अनेक राज्यात एनपीएत वाढ दिसत होती. भविष्यातील डिफॉल्टरची संख्या वाढण्याचा धोका तर आहेच, पण काही राज्यात राजकोषीय तुटीची परिस्थिती अधिक वाईट झालेली पाहायला मिळणार आहे.
कृषी कर्जमाफीबाबत एसबीआयला भीती
यापूर्वीच्या कृषी कर्जमाफीमुळे भविष्यातील कर्जाच्या परतफेडीवरही परिणाम होत असल्याचे मत, देशातील सर्वात मोठ्या असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने व्यक्त केले आहे.
By admin | Published: June 22, 2017 01:43 AM2017-06-22T01:43:50+5:302017-06-22T01:43:50+5:30