Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त 'या' नंबरवर एक मिस्ड कॉल द्या अन् लोन मिळवा, SBI ने सुरू केली खास सुविधा, फायदाच फायदा होणार

फक्त 'या' नंबरवर एक मिस्ड कॉल द्या अन् लोन मिळवा, SBI ने सुरू केली खास सुविधा, फायदाच फायदा होणार

State Bank of India And Loan : बँकेमध्ये जाण्याची गरज नाही तर फक्त एका मिस कॉलने तुमचं काम सोपं होणार असून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:23 PM2021-02-17T17:23:15+5:302021-02-17T17:28:33+5:30

State Bank of India And Loan : बँकेमध्ये जाण्याची गरज नाही तर फक्त एका मिस कॉलने तुमचं काम सोपं होणार असून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे. 

sbi give personal loan in low interest rate give miss call and get all details | फक्त 'या' नंबरवर एक मिस्ड कॉल द्या अन् लोन मिळवा, SBI ने सुरू केली खास सुविधा, फायदाच फायदा होणार

फक्त 'या' नंबरवर एक मिस्ड कॉल द्या अन् लोन मिळवा, SBI ने सुरू केली खास सुविधा, फायदाच फायदा होणार

नवी दिल्ली - विविध गोष्टींसाठी सर्वांनाच पैशांची गरज असते. जर तुम्ही देखील पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (State Bank of India)  आपल्या ग्राहकांसाठी खास नवीन योजना आणली आहे. यामध्ये पर्सनल लोनसाठी (Personal Loan) हवं असणाऱ्या लोकांना मोठा लाभ मिळणार आहे. यासाठी बँकेमध्ये जाण्याची गरज नाही तर फक्त एका मिस कॉलने तुमचं काम सोपं होणार असून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे. 

एसबीआयने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ 7208933142 या क्रमांकावर फक्त एक मिसकॉल द्यायचा आहे. त्यानंतर बँक तुम्हाला लगेचच फोन करून याबाबत नेमकी माहिती देईल. याबाबत अधिक तपशील जाणून घेऊया....

पर्सनल लोनचे फीचर्स

- या पर्सनल लोनसाठी तुम्हाला 9.60 टक्के व्याजदर द्यावा लागणार आहे.

- 20 लाख रुपयांपर्यंतच पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता.

- कमी व्याज दर

- कमी प्रोसेसिंग चार्ज

- कमीतकमी कागदपत्रं लागणार

- झिरो हिडन कॉस्ट

- सिक्युरिटी आणि गॅरंटरची गरज भासणार नाही.

या सेवेविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 1800-11-2211 या टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता. याचबरोबर 7208933142 या क्रमांकावर फोन करून देखील माहिती मिळवू शकता. तुम्हाला मेसेजद्वारे देखील माहिती मिळणार आहे. यासाठी तुम्हाला PERSONAL असं टाईप करून 7208933145 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर देखील तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: sbi give personal loan in low interest rate give miss call and get all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.