Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI 'या' कंपनीला फ्रॉड टॅग लिस्टमधून काढलं बाहेर, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय

SBI 'या' कंपनीला फ्रॉड टॅग लिस्टमधून काढलं बाहेर, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय

स्टेट बँक ऑफ इंडियानं या कंपनीला फ्रॉड टॅग लिस्टमधून काढून टाकलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 09:38 AM2024-01-27T09:38:07+5:302024-01-27T09:38:34+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियानं या कंपनीला फ्रॉड टॅग लिस्टमधून काढून टाकलं आहे.

SBI has removed Religare Finvest Limited company from the fraud list following the High Court verdict | SBI 'या' कंपनीला फ्रॉड टॅग लिस्टमधून काढलं बाहेर, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय

SBI 'या' कंपनीला फ्रॉड टॅग लिस्टमधून काढलं बाहेर, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय

रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेडशी (Religare Finvest Limited) संबंधित एक चांगली बातमी आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं (State bank Of india)  रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडला (RFL) फ्रॉड टॅग लिस्टमधून काढून टाकलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेनं हा निर्णय घेतलाय. भारतीय स्टेट बँक ही रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडला मुख्य कर्ज देणारी बँक आहे. 

१८ डिसेंबर २०२३ रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फ्रॉड डेझिग्नेशन समाप्त करण्याचे निर्देश दिले होते. ज्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. आरएफएल ही रेलिगेअर एन्टरप्रायझेसची (Religare Enterprises) उपकंपनी आहे. स्टेट बँकेनं रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेडला यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये रेलिगेअरच्या उपकंपनीनं एकाच वेळी १६ कर्जदारांना ९००० कोटी रुपये दिले होते. हे पेमेंट ऑर्गेनिक कलेक्शन द्वारे केलं गेलं. आरएफएलने रिट याचिका दाखल केली होती. ज्यावर हा निर्णय आला आहे. स्टेट बँकेच्या निर्णयानंतर आता आरएफएल रिझर्व्ह बँकेचा करेक्टिव्ह अॅक्शन प्लॅन हटवण्याची वाट पाहत आहे. रिझर्व्ह बँकेनं जानेवारी २०१८ मध्ये ही बंदी घातली होती. 

Web Title: SBI has removed Religare Finvest Limited company from the fraud list following the High Court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.