Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI Alert : एसबीआयने अनेक खाती गोठवली; जाणून घ्या, कशी करायची अनफ्रीझ?

SBI Alert : एसबीआयने अनेक खाती गोठवली; जाणून घ्या, कशी करायची अनफ्रीझ?

SBI Alert : जी खाती केवायसी (KYC for SBI Account) करण्यात आलेली नाहीत, ती बँकेने मोठ्या प्रमाणावर खाती गोठवली आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:45 PM2022-07-08T13:45:59+5:302022-07-08T13:46:28+5:30

SBI Alert : जी खाती केवायसी (KYC for SBI Account) करण्यात आलेली नाहीत, ती बँकेने मोठ्या प्रमाणावर खाती गोठवली आहेत. 

sbi have freezed many accounts for not having kyc done customer will not be able any transaction | SBI Alert : एसबीआयने अनेक खाती गोठवली; जाणून घ्या, कशी करायची अनफ्रीझ?

SBI Alert : एसबीआयने अनेक खाती गोठवली; जाणून घ्या, कशी करायची अनफ्रीझ?

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही देखील बँकेचे ग्राहक  (SBI Customers) असाल तर लगेच तुमचे खाते चेक करा. जी खाती केवायसी (KYC for SBI Account) करण्यात आलेली नाहीत, ती बँकेने मोठ्या प्रमाणावर खाती गोठवली आहेत. 

बँकेने अशी खाती तात्पुरती गोठवली आहेत आणि आता ग्राहक कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाहीत. त्यामुळे अशा स्थितीत ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ग्राहकांनी खाते गोठवल्याची माहिती सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. ज्यांना त्यांच्या खात्यातून पगार काढावा लागत आहे, अशा लोकांना खूप त्रास होत आहे. KYC मुळे तुमचे खाते देखील गोठवले गेले असेल, तर तुम्ही या प्रक्रियेद्वारे ते नियमित किंवा अनफ्रीझ करू शकता.

केवायसी अपडेट करणे आवश्यक 
दरम्यान, जुलैमध्ये अनेक प्रकारचे नियम बदलण्यात आले आहेत. या नियमांमध्ये बँक खात्यात ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जुलैमध्ये, ज्यांचे केवायसी पूर्ण झाले नाही, त्यांची खाती गोठवण्याबाबत बँकेने म्हटले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बँकांना दिशानिर्देश दिले होते की, त्यांनी लवकरात लवकर केवायसी करावे. फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक ग्राहकाला दर 10 वर्षांनी त्यांचे खाते केवायसी अपडेट  (KYC Update) करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे करा केवायसी...
केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड  (PAN Card) आणि आधार कार्डची (Aadhaar Card) एक कॉपी बँकेक जमा करावी लागेल. यासोबतच तुम्हाला बँकेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म पासपोर्ट आकाराच्या फोटोसह जमा करावा लागेल. यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

Web Title: sbi have freezed many accounts for not having kyc done customer will not be able any transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.