Join us  

SBI ग्राहकांना देणार झटका! आता कर्ज होणार महाग, ईएमआयही महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 10:58 AM

स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपल्या ग्राहकांना झटका देणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर पुन्हा वाढ केली, ०.२५ बेसीस पॉइंटने ही वाढ केली.

स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपल्या ग्राहकांना झटका देणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर पुन्हा वाढ केली, ०.२५ बेसीस पॉइंटने ही वाढ केली. यामुळे देशातील बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने सर्व कालावधीसाठी निधी आधारित कर्ज दर  १० आधार अंकांनी वाढवला आहे.

एसबीआयने एमसीएलआरचे रेट १० बेसीस पॉइंटने वाढवून ७.८५ टक्क्यापासून ७.९५ टक्के केली. १ महिन्यासाठी एमसीएलआर रेट ८ टक्क्यांपासून ८.१० टक्के केली आहे. ३ महिन्यांसाठी एमसीएलआर रेट ८ टक्क्यांवरुन ८.१० टक्के केली. बँकेचा MCLR दर ६ महिन्यांसाठी ८.३०% वरून ८.४०%, MCLR १ वर्षासाठी ८.४०% वरून ८.५०%, २ वर्षांसाठी MCLR ८.५०% वरून ८.६०% आणि MCLR ८.६०% वरून १० आधार अंकांनी वाढला आहे. ३ वर्षांसाठी ८.७० पर्यंत गेला आहे. 

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट हा किमान दर आहे, यावर बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते. 

मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना देणार मोठं गिफ्ट! कर्मचारी होणार मालामाल

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) हा किमान दर आहे ज्यावर बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१६ मध्ये विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर ठरवण्यासाठी एमसीएलआर दर लागू केला. ग्राहकांचा ईएमआय एमसीएलआर दरात वाढ किंवा कमी करून ठरवला जातो. म्हणजेच, जर बँकेने एमसीएलआर दरात कोणतीही वाढ केली तर तुमच्या कर्जाचे व्याजदर वाढतील, तर बँकेने MCLR दर कमी केल्यास तुमच्या कर्जाचे व्याजदर कमी होतील.

टॅग्स :एसबीआयबँकभारतीय रिझर्व्ह बँक