Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ३० जूनपासून बदलणार बँकेचे नियम  

SBI: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ३० जूनपासून बदलणार बँकेचे नियम  

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही देशातील सरकारी बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला ३० जून ही तारीख महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 03:56 PM2023-05-27T15:56:52+5:302023-05-27T15:57:15+5:30

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही देशातील सरकारी बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला ३० जून ही तारीख महत्त्वाची आहे.

SBI: Important news for millions of SBI customers, bank rules to change from June 30 | SBI: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ३० जूनपासून बदलणार बँकेचे नियम  

SBI: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ३० जूनपासून बदलणार बँकेचे नियम  

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही देशातील सरकारी बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला ३० जून ही तारीख महत्त्वाची आहे. ३० जूनपासून बँक काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. त्याचा परिणाम देशातील कोट्यवधी ग्राहकांवर होणार आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ३० जूनपासून बँक लॉकरबाबतच्या नियमामध्ये बदल करणार आहे. बँकेने याबाततची  अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात सांगितले की, इंटरनेटवर लॉकरधारकांना ३० जून २०२३ पर्यंत रिवाइज्ड लॉकर अॅग्रिमेंटवर सही करण्याचं आवाहन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून बँक याबाबत सातत्याने अधिसूचना प्रसिद्ध करत आहे.

बँकेने ग्राहकांना लॉकर अॅग्रिमेंटवर लवकरात लवकर सह्या करण्याचं आवााहन केलं आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये सांगितलं की, प्रिय ग्राहक, रिवाइज्ड लॉकर अॅग्रिमेंटच्या सेटलमेंटसाठी कृपया आपल्या शाखेमध्ये जा. जर तुम्ही आधीच अपडेटेड अॅग्रिमेंटवर सह्या केल्या असतील तर तुम्हाला आताच सप्लिमेंट्री अॅग्रिमेंट करण्याची गरज आहे.

एसबीआयबरोबरच बँक ऑफ बडोदानेसुद्धा ग्राहकांकडे निर्धारित तारखेपर्यंत रिवाइज्ड लॉकर अॅग्रिमेंटवर सह्या करण्याचे आवाहन केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेसुद्धा २३ जानेवारी २०२३ रोजी ग्राहकांना विचारात घेऊन एक सर्क्युलर प्रसिद्ध केलं आहे. या सर्क्युलरनुसार सर्व बँकांनी लॉकरशी संबंधित नियम आणि करारांची माहिती दिली पाहिजे. तसेच ५० टक्के ग्राहक करारांवर ३० जूनपर्यंत आणि ७५ टक्के करारांवर ३० सप्टेंबरपर्यंत रिवाइज करणं आवश्यक आहे.

संशोधित नियमांनुसार, जर आग लागली, चोरी, दरोडा, बँकेचा बेफिकीरपणा किंवा कर्मचाऱ्यांकडून कुठलीही घटना घडली तर बँकेकडूनच त्याची नुकसानभरपाई केली जाईल. ही नुकसान भरपाई वार्षिक भाड्यापेक्षा १०० पट असते.  

Web Title: SBI: Important news for millions of SBI customers, bank rules to change from June 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.