देशातील सर्वात मोठी बँक म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने काल व्याजदारात मोठी वाढ केल्याने कर्जदारांना मोठा धक्का दिलेला असताना ठेवीदारांना सुखद धक्का दिला आहे. मात्र, हा धक्का मोठ्या ठेवीदारांसाठी दिला आहे.
एसबीआयने (SBI) फिक्स्ड डिपॉजिट (FD) वर व्याज दर वाढविला आहे. ही वाढ 2 कोटी रुपये आणि त्यापेक्षा जास्त डोमेस्टिक बल्क टर्म डिपॉझिटच्या व्याजामध्ये केली आहे. यापेक्षा कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदरावत कोणताही बदल केलेला नाही. हे नवीन व्याजदर 15 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. बँकेने एफडी रेट 0.10 टक्क्यांनी वाढविला आहे.
आता SBI या मुदत ठेवींवरील व्याज दर वार्षिक 3 टक्क्यांपासून सुरू होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ते वार्षिक 3.50 टक्क्यांपासून सुरू होते. सुधारित दर ताज्या बल्क एफडी आणि मुदत संपलेल्या एफडीच्या नूतनीकरणावर लागू होतील. वाढीनंतर, विविध मुदतीच्या देशांतर्गत बल्क मुदत ठेवींसाठी लागू होणारे नवीन एफडी दर खालीलप्रमाणे आहेत...
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या (SBI) ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. एसबीआयने व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. नवे दर बुधवारपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत. आता नवीन व्याजदर ग्राहकांना 0.10 टक्के दराने देय असतील. यासोबतच बँकेने प्राइम लेंडिंग रेट वाढवण्याचा निर्णय घेतला असून तो 10 टक्क्यांवरून 12.30 टक्के करण्यात आला आहे. तसेच, बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच हा नवा दर 7.55 टक्के असेल.
SBI Base Rate: एसबीआयच्या ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले व्याजदर, तपासा नवीन दर