Join us

२ हजार रुपयांची नोट बदलायचीय? ना ओळखपत्र, ना द्यावा लागेल अर्ज; SBI'ने काढले परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 9:24 AM

देशभरात नोटा खपविण्यासाठी पळापळ.

दोन हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकांची पळापळ सुरू झाली आहे. सोशल मीडियावर नोटा बदलण्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली कोणताही अर्ज जात असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी एसबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे. २३ मेपासून बँकांमध्ये नोट बदलण्यास सुरुवात होणार असून त्यासाठी कोणतेही ओळखपत्र द्यावे लागणार नाही, ना कोणता अर्ज भरावा लागणार आहे.

एसबीआयने परिपत्रक काढून नोट बदलण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी एक विनंतीवजा स्लीप भरावी लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ती सूचना रद्द केल्याचे एसबीआयच्या नव्या परिपत्रकात म्हटले आहे. परिपत्रक देशभरातील सर्व शाखांना पाठविण्यात आले आहे.

Rs 2000 NoteBan: २०० रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर सोन्याची मागणी वाढली, किंमतही प्रचंड वाढ

नोटा बदलण्यापूर्वी हे जाणून घ्या

नोट बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही.कोणताही अर्ज भरावा लागणार नाही.

कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.

एका वेळी जास्तीत जास्त १० नोटा बदलता येतील.

बँक खात्यात नोट जमा करण्यासाठी निर्बंध नाहीत.

खात्यात रक्कम जमा करण्यासाठी इतर वेळी लागू असलेल्या नियमांचे पालन करावे लागणार.

३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलणे किंवा खात्यात जमा करण्याची मुदत आहे. 

दोन हजारांची नोट खपविण्यास काही पण.....

आरबीआयच्या निर्णयानंतर लोकांमध्ये काही तरी खरेदी करून या नोटा खपविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोने खरेदीपासून किराणा सामान विकत घेण्यासाठी लोक दोन हजार रुपयांच्या नोटेचा वापर करीत आहेत. तसेच पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांची नोट खपविण्यावर लोकांचा भर दिसत आहे.

दोन दिवसांमध्ये ४ ते ५ पटीने या नोटांची संख्या वाढली आहे.

गाडी खरेदीसाठी २ हजारांच्या नोटांमध्ये डाउनपेमेंट

नवे वाहन खरेदी करण्यासाठी लोक २ हजारांच्या नोटांद्वारे डाउनपेमेंट करीत आहेत. याबाबत वाहन विक्रेत्यांना विचारणा करूनच लोक वाहन खरेदी करीत आहेत.

५०० च्या नोटांची छपाई वाढली

 आरबीआयच्या निर्णयानंतर नोटा छापण्याच्या कारखान्यांमध्ये आता ५०० रुपयांच्या नोटेची छपाई वाढली आहे. मध्य प्रदेशात देवास येथील कारखान्यात दररोज २.२ कोटी नोटा छापल्या जाणार आहेत.

 तेथे इतर नोटांचीही छपाई होते. मात्र, आता केवळ ५०० रुपयांच्याच नोटा छापण्यात येत आहेत. कर्मचारीही ११ तासांच्या शिफ्टमध्ये काम करतील. तसेच कर्मचाऱ्यांची रविवारची साप्ताहिक रजा रद्द करण्यात आली.

कर, बिल भरण्यासाठी नोटांचा वापर

लोक वेगवेगळे बिल तसेच कर भरण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटा देत आहेत. एवढेच नव्हे तर गुजरातमध्ये एकाने ६.५ लाखांचा दंड भरताना तब्बल ४.५ लाख रुपये २ हजाराच्या नोटांनी दिले.

टॅग्स :नोटाबंदीएसबीआय