Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI ग्राहकांनी लक्ष द्या! 16-17 जुलैला या वेळात बंद राहणार इंटरनेट बँकिंग, UPI, YONO सर्व्हिस

SBI ग्राहकांनी लक्ष द्या! 16-17 जुलैला या वेळात बंद राहणार इंटरनेट बँकिंग, UPI, YONO सर्व्हिस

Attention SBI customers! एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. या बँकेचे कोट्यवधी ग्राहक आहेत. यामुळे या बँकेचा पसाराही मोठा आहे. हॅकिंगचा धोका असल्याने ग्राहकांचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी वेळोवेळी एसबीआय डिजिटल बँकिंग सेवा अपग्रेड करत राहते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 05:22 PM2021-07-15T17:22:53+5:302021-07-15T17:23:32+5:30

Attention SBI customers! एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. या बँकेचे कोट्यवधी ग्राहक आहेत. यामुळे या बँकेचा पसाराही मोठा आहे. हॅकिंगचा धोका असल्याने ग्राहकांचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी वेळोवेळी एसबीआय डिजिटल बँकिंग सेवा अपग्रेड करत राहते.

SBI Internet Banking, UPI, Yono Services To Be Unavailable; Check Timings | SBI ग्राहकांनी लक्ष द्या! 16-17 जुलैला या वेळात बंद राहणार इंटरनेट बँकिंग, UPI, YONO सर्व्हिस

SBI ग्राहकांनी लक्ष द्या! 16-17 जुलैला या वेळात बंद राहणार इंटरनेट बँकिंग, UPI, YONO सर्व्हिस

SBI Digital Banking Services: भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. स्टेट बँकेची (State bank) डिजिटल बँकिंग सेवा 16 आणि 17 जुलै रोजी 150 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म अपडेट करण्याचे काम करण्यात येणार आहे. ही सेवा रात्रीच्या वेळी प्रभावित होणार आहे. स्टेट बँकेने ट्विट द्वारे याची माहिती दिली आहे. (State Bank of India (SBI) online internet banking, UPI, YONO and YONO Lite services will be unavailable for 150 minutes starting on Friday night.)

बँकेने म्हटले की, मेन्टेनन्सचे काम 16 जुलैच्या रात्री 10.45 वाजल्यापासून मध्यरात्रीनंतर 17 जुलैला 1.15 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी इंटरनेट बँकिंग,योनो, योनो लाईट, युपीआय सेवा उपलब्ध असणार नाहीत. ग्राहकांनी सहकार्य करावे. 

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. या बँकेचे कोट्यवधी ग्राहक आहेत. यामुळे या बँकेचा पसाराही मोठा आहे. हॅकिंगचा धोका असल्याने ग्राहकांचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी वेळोवेळी एसबीआय डिजिटल बँकिंग सेवा अपग्रेड करत राहते. यासाठी काही काळ ही सेवा बंद केली जाते. एसबीआयच्या देशभरात 22,000 हून अधिक शाखा आहेत. तसेच 57,889 एटीएम आहेत. 31 डिसेंबर 2020 ला एसबीआयची इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 8.5 कोटी आणि 1.9 कोटी होती. तर बँकेच्या युपीआयचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या ही 13.5 कोटी रुपये आहे. 

चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक; ही चूक पडू शकते महागात 

चिनी हॅकर्स State Bank of India (SBI) च्या ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. यासाठी हॅकर्स KYC अपडेट आणि फ्री गिफ्ट असे मेसेज पाठवून अकॉउंट हॅक करण्याचे प्रयत्न करत आहेत. सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने सांगितले आहेत कि चिनी हॅकर्स WhatsApp चा वापर हे मेसेजेस पाठवण्यासाठी करत आहेत.  

साइबरपीस फाउंडेशनच्या नवी दिल्ली विंग आणि Autobot Infosec Pvt Ltd ने अश्या दोन प्रकरणांची माहिती दिली आहे, ज्यात SBI च्या नावाने युजर्सना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. फसवणूक करण्यासाठी ज्या डोमेन नेमचा वापर केला जात आहे त्या सर्वांची नोंदणी चीनमध्ये करण्यात आली आहे.  

Web Title: SBI Internet Banking, UPI, Yono Services To Be Unavailable; Check Timings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.