SBI Market Value Rise: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) साठी मागचा आठवडा खुप चांगला ठरला. बँकेच्या शेअर धारकांनी अवघ्या चार दिवसांत सुमारे 27,000 कोटी रुपये कमावले. पण, दुसरीकडे मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते एअरटेलपर्यंत...अनेक कंपन्यांचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणावर घसरले.
टॉप 10 पैकी 6 कंपन्यांना तोटा
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. दिवसाच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक 147.99 अंकांनी किंवा 0.20 टक्क्यांनी वधारला. या कालावधीत सेन्सेक्सच्या टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे मार्केट कॅप 68,417.14 कोटी रुपयांनी कमी झाले.
बँकिंग शेअर्समध्ये जोरदार वाढ
गेल्या आठवड्यात ज्या चार कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला, त्यात एसबीआय आघाडीवर होती. एसबीआय शेअरमध्ये वाढ झाल्याने बाजार भांडवल 7,42,126.11 कोटी रुपयांवर पोहोचले. केवळ चार दिवसांत यात 26,907.71 कोटी रुपयांची वाढ झाली. खासगी क्षेत्रातील ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांनीही चार दिवसांत 24,651.55 कोटी रुपये कमावले. तर, ICICI बँकेचे मार्केट कॅप 8,02,401.77 कोटी रुपयांवर पोहोचला.
टीसीएसची मोठी कमाई
टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसचाही चार कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये समावेश आहे. गेल्या आठवड्यात कंपनीचे बाजार भांडवल 9,587.93 कोटी रुपयांनी वाढले आणि 13,89,110.43 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले. याशिवाय HDFC बँकेच्या बाजार मूल्यात 6,761.25 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आणि त्यामुळेच मार्केट कॅप 11,53,704.84 कोटी रुपये झाले.
रिलायन्ससह या गुंतवणूकदारांना फटका
गेल्या आठवड्यात ज्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले, त्यत भारती एअरटेल आघाडीवर होती. एअरटेलचे मार्केट कॅप 27,635.65 कोटी रुपयांनी घसरून 7,23,770.70 कोटी रुपयांवर आले. तर, रिलायन्स मार्केट कॅप 23,341.56 कोटी रुपयांनी घसरून 19,40,738.40 कोटी रुपयांवर आले. याशिवाय LIC 5,724.13 कोटी रुपयांनी घसरून 6,19,217.27 कोटी रुपयांवर आले. तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे मार्केट कॅपदेखील 5,686.69 कोटी रुपयांनी घसरून 5,87,949.62 कोटी रुपयांवर आले आहे.
(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)