Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI MCLR: SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार

SBI MCLR: SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार

SBI MCLR : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने MCLR मध्ये 10 पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे आता होम-ऑटो-पर्सनल लोन महाग होणार असल्याचे मानले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:10 PM2022-04-18T12:10:21+5:302022-04-18T12:10:29+5:30

SBI MCLR : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने MCLR मध्ये 10 पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे आता होम-ऑटो-पर्सनल लोन महाग होणार असल्याचे मानले जात आहे.

SBI MCLR: SBI hikes MCLR across all tenures home loan car loan, EMI may increase | SBI MCLR: SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार

SBI MCLR: SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार

SBI Hikes MCLR : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्य SBIने मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट (MCLR) 10 बेसिस पॉइंट्सने वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हा बदल 15 एप्रिलपासून लागू झाला आहे.

कर्जाचा EMI वाढेल
MCLR वाढल्याने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज महाग होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल. SBI च्या वेबसाइटनुसार, एक रात्र ते तीन महिन्यांसाठी मार्जिनल कॉस्ट लँडिंग रेट 6.65% ऐवजी 6.75% असेल. याशिवाय 6 महिन्यांसाठी 6.95 टक्क्यांऐवजी 7.05 टक्के असेल. तर, एका वर्षासाठी 7.10%, दोन वर्षांसाठी 7.30% आणि तीन वर्षांसाठी 7.40% असेल.

MCLR म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने 2016 मध्ये MCLR प्रणाली सुरू केली होती. हा कोणत्याही वित्तीय संस्थेसाठी अंतर्गत बेंचमार्क आहे. MCLR प्रक्रियेत, कर्जासाठी किमान व्याजदर निश्चित केला जातो.

Web Title: SBI MCLR: SBI hikes MCLR across all tenures home loan car loan, EMI may increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.