Join us

SBI ची विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर! YONO सोबत करा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, मिळेल 20% डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:06 PM

SBI YONO APP : एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

ठळक मुद्देबँकेच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला SBI YONO APP वर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँकएसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत एसबीआय विद्यार्थ्यांना काही सेवांवर 20 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. बँकेच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला SBI YONO APP वर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

एसबीआयची ही ऑफर प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि टेस्टबुक डॉट कॉम (testbook.com) यांच्यातील सहकार्याचा भाग आहे. testbook.com वर सर्व प्रकारचे ऑनलाइन स्टडी मटेरिअल, टेस्ट सीरिज आणि परीक्षांसाठी आवश्यक अन्य प्रकारचे नोट्स उपलब्ध आहेत.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'परीक्षांसाठी तयार राहा! YONO SBI च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल. अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी  http://bit.ly/3d7vTkH या लिंकवर क्लिक करा.'

एसबीआय टेस्टबुक पासवर 20% डिस्काउंट आणि टेस्टबुक सिलेक्टवर 10% डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. टेस्टबुक पास एक स्पेशल मेंबरशिप पास आहे, जो यावर उपलब्ध सर्व परीक्षांचा अॅक्सेस देतो. टेस्टबुक पासच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परीक्षांसाठी  कितीही चाचण्या देऊ शकता. यासाठी तुम्हाला किमान शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क आधी 299 रुपये होते.  या ऑफरचा लाभ घेण्यासाठी YONO अॅपवरून रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यामध्ये YONO20 कोड टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना या ऑफरचा लाभ मिळेल.

याचप्रमाणे बँक टेस्टबुक सिलेक्टवर 10% सवलत देत आहे. टेस्टबुक सेलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सेलिक्शन कमिशन, रेल्वे, बँकिंग, एअर फोर्स, टीचिंग, सिव्हिल सर्व्हिसेज आणि अन्य सर्व सरकारी संस्थांसाठी ऑनलाइन लाईव्ह कोचिंग उपलब्ध आहे.

अशाप्रकारे ऑफरचा लाभ घ्या...1) SBI YONO डाऊनलोड करून त्यावर लॉगिन करा. 2 ) एसबीआय योनो अॅफवर शॉप अँड ऑर्डर सेक्शनमध्ये जा.3) त्यानंतर Read [study] Learn लिंकवर क्लिक करा.4) या लिंकवर क्लिक केल्यानंतर Testbook  येईल.

टॅग्स :एसबीआयबँकविद्यार्थीव्यवसाय