नवी दिल्ली- देशातली सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) नवरात्रीनिमित्त स्वतःच्या ग्राहकांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. जर तुमचं एसबीआय बँकेत अकाऊंट असेल तर या ऑफरसंदर्भात माहिती करून घ्या. एसबीआयनं ट्विट करत या खास ऑफरची माहिती दिली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकाला एसबीआयच्या युनो अॅपच्या माध्यमातून ह्युंदाईची हल्लीच लाँच झालेली सेंट्रो बुक करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे ही कार बुक केल्यानंतर तुम्हाला आणखी एक कार घरी नेण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही ह्युंदाई सँट्रो कारची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला आय 10 ही कार जिंकण्याचीही संधी आहे. परंतु ही ऑफर फक्त 24 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित असेल. जर तुम्ही नवी सँट्रो कार खरेदी करण्याचा प्लॉन करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली ऑफर ठरेल, तसेच या ऑफरसह एसबीआयनं तुम्हाला गुंतवणुकीचीही एक चांगली ऑफर देणार आहे.
SBIनं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. गुंतवणूकदारांना गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. 15 ऑक्टोबर 2018पासून फेब्रुवारी 2019पर्यंत प्रत्येक महिन्याला बाँड जारी केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदार 15 ऑक्टोबरपासून 19 ऑक्टोबरपर्यंत या बाँड अंतर्गत गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच हा बाँड 23 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.
This #Navratri, get your dream car on #YONOSBI! Book the newly launched Hyundai Santro on yono and stand a chance to win a Hyundai Grand i10. Book by 24th October 2018. Download: https://t.co/yjDSsjkoWj#SBI#StateBankOfIndia#YONOSBI#Automall#OnlineMarketPlace#Lifestylepic.twitter.com/r3yd8PkWi8
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 12, 2018
काय आहे बाँडची किंमत ?
बाँड खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा ऑनलाइन पेमेंट करू शकतो. तसेच कॅश पेमेंटमध्येही चांगल्या ऑफर मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला 20 हजार रुपयांपर्यंत या बाँडमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.