Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI Amrit Vrishti FD : जबरदस्त योजना! SBI 'अमृत ​​वृष्टी एफडी'तून देतंय मोठा परतावा; वाचा काय आहे स्कीम

SBI Amrit Vrishti FD : जबरदस्त योजना! SBI 'अमृत ​​वृष्टी एफडी'तून देतंय मोठा परतावा; वाचा काय आहे स्कीम

SBI Amrit Vrishti FD : एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना लाँच करत असते, आता एसबीआयची 'अमृत ​​वृष्टी एफडी ही योजना मोठा फायदा देणारी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 02:10 PM2024-08-13T14:10:37+5:302024-08-13T14:11:27+5:30

SBI Amrit Vrishti FD : एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना लाँच करत असते, आता एसबीआयची 'अमृत ​​वृष्टी एफडी ही योजना मोठा फायदा देणारी आहे.

SBI offers huge returns from Amrit Vrishti FD Read details | SBI Amrit Vrishti FD : जबरदस्त योजना! SBI 'अमृत ​​वृष्टी एफडी'तून देतंय मोठा परतावा; वाचा काय आहे स्कीम

SBI Amrit Vrishti FD : जबरदस्त योजना! SBI 'अमृत ​​वृष्टी एफडी'तून देतंय मोठा परतावा; वाचा काय आहे स्कीम

SBI Amrit Vrishti FD :  प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नातील काही रक्कम बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी आपण बँकेतील वेगवेगळ्या योजनांमध्ये पैशाची गुंतवणूक करतो. एसबीआयबँकेने आपल्या ग्राहकांसाठी अशीच एक अमृत ​​वृष्टी एफडी'योजना लाँच केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे मोठा परतावा मिळू शकतो. 

पगारकपात, नाेकरीवरून काढल्याने जगण्याचा प्रश्न; हिरे उद्याेगाची चकाकी घटली

मुदत ठेव (FD) हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय आहे. एफडी गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. या योजनांमध्ये, गुंतवणूकदाराला उच्च व्याजदरांसह इतर अनेक फायदे मिळतात. यापैकी एक योजना स्टेट बँक ऑफ इंडियाची देखील आहे. SBI ने गुंतवणूकदारांसाठी अमृत दृष्टी FD योजना सुरू केली आहे. 

'अमृत ​​दृष्टी एफडी' योजना

SBI अमृत दृष्टी FD ४४४ दिवसासाठी आहे. यामध्ये सामान्य नागरिकांना वार्षिक ७.२५ टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळते. या योजनेत ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करता येईल. या योजनेत तुम्ही कमाल ३ कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकता.

एफडी पूर्ण होण्याचा कालावधी- ४४४ दिवस

व्याज दर - ७.२५ टक्के

जास्तीत जास्त ३ कोटींची गुंतवणूक करता येणार

इतर बँकांचे एफडी व्याज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त, इतर बँका देखील त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या एफडी योजना चालवतात. या FD योजनेवर मिळणारे व्याजदर SBI अमृत वृष्टी FD पेक्षा खूप वेगळा आहे. 

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये, ४०० दिवसांच्या कालावधीसह FD वर जास्तीत जास्त व्याज सामान्य नागरिकांसाठी ७.३० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८० टक्के आहे.

कॅनरा बँकेच्या ४४४ दिवसांच्या FD वर, सामान्य नागरिकांना ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळते.

युनियन बँक ऑफ इंडिया ३९९ दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज देते.

बँक ऑफ बडोदाची बॉब मान्सून धमाका ठेव योजना जी ३९९ दिवसांची आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक ७.२५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज दिले जाते.

Web Title: SBI offers huge returns from Amrit Vrishti FD Read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.