Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स

SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स

सॅलराइड क्लास्ड लोकांसाठी मोठी रक्कम वाचवणं आणि एकाच वेळी गुंतवणूक करणं थोडं कठीण आहे. पण गुंतवणूक ही महत्त्वाचीच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 01:07 PM2024-02-17T13:07:04+5:302024-02-17T13:08:12+5:30

सॅलराइड क्लास्ड लोकांसाठी मोठी रक्कम वाचवणं आणि एकाच वेळी गुंतवणूक करणं थोडं कठीण आहे. पण गुंतवणूक ही महत्त्वाचीच आहे.

SBI or Post Office Where to deposit money every month will get more interest see details investment tips | SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स

SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स

SBI Vs Post Office RD: सॅलराइड क्लास्ड लोकांसाठी मोठी रक्कम वाचवणं आणि एकाच वेळी गुंतवणूक करणं थोडं कठीण आहे. ते मुख्यतः दर महिन्याला काही रक्कम त्यांच्या पगारातून काढून गुंतवत असता. त्यांचा मासिक खर्चही जवळपास ठरलेला असतो. आज आम्ही तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट (RD) या योजनेबद्दल सांगत आहोत, जी दरमहा पैसे वाचवण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. दर महिन्याला काही पैसे वाचवून आरडीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही काही कालावधीत मोठा निधी उभारू शकता.
 

एसबीआय रिकरिंग डिपॉझिट
 

एसबीआय एक वर्ष ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी आरडी ऑफर करत आहे. एसबीआय सामान्य लोकांना रिकरिंग डिपॉझिटवर 6.5% ते 7% व्याज देत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7% ते 7.5% व्याज देत आहे.
 

एसबीआयचे आरडीचे दर
 

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी 6.80% (सर्वसाधारण) 7.30% (ज्येष्ठ नागरिक)
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी 7% (सर्वसाधारण) 7.50% (ज्येष्ठ नागरिक)
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी 6.50 (सर्वसाधारण) 7.00 (ज्येष्ठ नागरिक)
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत 6.50 (सर्वसाधारण) 7.50 (ज्येष्ठ नागरिक)
 

पोस्ट ऑफिस आरडी
 

पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते. पोस्ट ऑफिस आरडी योजना ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ देत नाही. पोस्ट ऑफिस आरडीचे 5 वर्षांसाठी आरडीचे व्याजदर 6.7% आहेत.

Web Title: SBI or Post Office Where to deposit money every month will get more interest see details investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.