SBI Vs Post Office RD: सॅलराइड क्लास्ड लोकांसाठी मोठी रक्कम वाचवणं आणि एकाच वेळी गुंतवणूक करणं थोडं कठीण आहे. ते मुख्यतः दर महिन्याला काही रक्कम त्यांच्या पगारातून काढून गुंतवत असता. त्यांचा मासिक खर्चही जवळपास ठरलेला असतो. आज आम्ही तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट (RD) या योजनेबद्दल सांगत आहोत, जी दरमहा पैसे वाचवण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. दर महिन्याला काही पैसे वाचवून आरडीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही काही कालावधीत मोठा निधी उभारू शकता.
एसबीआय रिकरिंग डिपॉझिट
एसबीआय एक वर्ष ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी आरडी ऑफर करत आहे. एसबीआय सामान्य लोकांना रिकरिंग डिपॉझिटवर 6.5% ते 7% व्याज देत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7% ते 7.5% व्याज देत आहे.
एसबीआयचे आरडीचे दर
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी 6.80% (सर्वसाधारण) 7.30% (ज्येष्ठ नागरिक)2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी 7% (सर्वसाधारण) 7.50% (ज्येष्ठ नागरिक)3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी 6.50 (सर्वसाधारण) 7.00 (ज्येष्ठ नागरिक)5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत 6.50 (सर्वसाधारण) 7.50 (ज्येष्ठ नागरिक)
पोस्ट ऑफिस आरडी
पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते. पोस्ट ऑफिस आरडी योजना ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ देत नाही. पोस्ट ऑफिस आरडीचे 5 वर्षांसाठी आरडीचे व्याजदर 6.7% आहेत.