नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) ग्राहकांच्या मुलांसाठी एक खास सुविधा आणली आली आहे. यात ग्राहकांना ऑनलाईन खाते उघडण्याची सुविधा दिली जात आहे. विशेष म्हणजे केवळ अल्पवयीन मुलांचा विचार करून बँकेने ही सुविधा सुरू केली गेली आहे.
या सुविधेचे नाव पहला कदम-पेहली उडान (Pehla Kadam, Pehli Udaan)असे आहे. यामध्ये बँक खाते उघडण्यासाठी मुलांना सुविधा देण्यात येईल. यासह मुलांच्या नावे खाते उघडल्यानंतर एटीएम सुविधा मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ही दोन बचत बँक खाती अल्पवयीन मुलांसाठी आहेत. ही खाती मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगद्वारे देखील वापरली जाऊ शकतात. हे खाते मुलांमधील पैसे वाचवण्याची सवय सुधारेल.
1. Pehla Kadam Saving Account
>> या खात्याअंतर्गत कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलांसह आई-वडील किंवा पालक संयुक्त खाते (ज्वाइंट अकाऊंट) उघडू शकतात.
>> हे खाते आई-वडील किंवा पालक आणि स्वत: मुलाद्वारे एकट्याने ऑपरेट केले जाऊ शकते.
>> हे कार्ड अल्पवयीन आणि पालकांच्या नावे दिले जाईल.
Pehla Kadam Saving Account चे फायदे...
या खात्यावर मोबाइल बँकिंग सुविधा उपलब्ध आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारची बिले देखील भरली जाऊ शकतात. यामध्ये दैनंदिन व्यवहार करण्याची मर्यादा आहे. मुलाच्या नावावर बँक खाते उघडल्यानंतर एटीएम-डेबिट कार्डची सुविधा देण्यात येईल. हे कार्ड अल्पवयीन आणि पालकांच्या नावे दिले जाईल. याद्वारे तुम्ही 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. इंटरनेट बँकिंग सुविधेत व्यवहार करण्यासाठी दररोज 5,00 रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. याद्वारे तुम्ही सर्व प्रकारचे बिले जमा करू शकता. तसेच, वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देखील पालकांसाठी उपलब्ध आहे.
12 कोटी लोकांसाठी खूशखबर! ऑगस्ट महिन्यात जमा होणार 'इतकी' रक्कम; जाणून घ्या, सविस्तर... https://t.co/xnY575I2iS#PMKisanSammanNidhi
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021
2. Pehli Udaan Saving Account
>> या खात्याला 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले, जी स्वत: साइन इन करू शकतात. ती Pehli Udaan च्या अंतर्गत खाते उघडू शकतात.
>> हे खाते पूर्णपणे अल्पवयीन व्यक्तीच्या नावे असेल.
>> मुलगा ते एकट्याने ऑपरेट करू शकतो.
Pehli Udaan द्वारे मिळणारी सुविधा
यामध्येही एटीएम-डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध असून तुम्ही दररोज 5000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. यासह मोबाइल बँकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये आपण दररोज 2000 रुपयांपर्यंत हस्तांतरित करू शकता. यासह, आपण सर्व प्रकारचे पेमेंट देखील देऊ शकता. तुम्ही इंटरनेट बँकिंग सुविधेत दररोज 5,000 रुपयांपर्यंत ट्रान्सफर करू शकता. Pehli Udaan मध्ये अल्पवयीन मुलास ओव्हरड्राफ्टची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
कशा प्रकारे खाते उघडू शकता...
>> सर्वात आधी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा. त्यानंतर पर्सनल बँकिंग वर क्लिक करा.
>> आता अकाउंट्स टॅबवर क्लिक करा आणि सेव्हिंग अकाऊंट ऑफ मायनर्सचा पर्याय निवडा.
>> त्यानंतर अप्लाय नाऊ वर क्लिक करा. नंतर आपल्याला डिजिटल आणि इंस्टा सेव्हिंग खात्याचे एक पॉप-अप फिचर्स दिसेल.
>> आता तुम्हाला Open a Digital Account या टॅबवर क्लिक करावे लागेल.
>> त्यानंतर Apply now क्लिक करून पुढील पेजवर जा.
>> खाते उघडण्यासाठी आपली संपूर्ण माहिती प्रविष्ट करा.
>> येथे लक्ष घ्या की, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकदा एसबीआय शाखेत भेट देणे आवश्यक आहे.
>> याशिवाय, तुम्ही एसबीआय शाखेत ऑफलाइन जाऊन खातेदेखील उघडू शकता.