नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर विम्याबाबत सर्वसामान्यांमध्ये समज वाढली आहे. सरकार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत कमी पैशात विम्याची सुविधाही उपलब्ध करून देत आहे. अशा प्रकारे सरकारच्या योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) तुम्हाला 4 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देत आहेत. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला फक्त 342 रुपये मोजावे लागतील.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने (SBI) आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करून या दोन योजनांची माहिती दिली आहे. एसबीआयने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'तुमच्या गरजेनुसार विमा घ्या आणि चिंतामुक्त जीवन जगा. बचत बँक खात्यातील खातेदारांकडून ऑटो डेबिट सुविधेद्वारे प्रीमियम कापला जाईल. व्यक्ती केवळ एका बचत बँक खात्याद्वारे योजनेत सामील होण्यास पात्र असेल.
Fulfilling the vision of ensuring social security for all! #PMJJBY is providing life insurance cover at a minimal premium of ₹330 per year for people between 18-50 years through their bank accounts. #AmritMahotsav@PMOIndia@FinMinIndiapic.twitter.com/xqBSoCR4Rk
— DFS (@DFS_India) February 15, 2022
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
दरम्यान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंग झाल्यास 2 लाख रुपयांची भरपाई उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत, जर विमाधारक अंशतः किंवा कायमचा अपंग झाला असेल तर त्याला 1 लाख रुपयांचे संरक्षण मिळते. यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती संरक्षण घेऊ शकते. या योजनेचा वार्षिक प्रीमियम देखील फक्त 12 रुपये आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)
विशेष म्हणजे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. या योजनेचा 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती लाभ घेऊ शकते. या योजनेसाठी तुम्हाला फक्त 330 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. दरम्यान, या दोन्ही मुदत विमा योजना आहेत. या विमा योजना एका वर्षासाठी असतात.
विमा संरक्षण 1 जून ते 31 मे पर्यंत
हे विमा संरक्षण 1 जून ते 31 मे पर्यंत आहे, हे तुम्हाला माहीत असावे. यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खाते बंद झाल्यामुळे किंवा प्रिमियम कपातीच्या वेळी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे विमा रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे विमा घेण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.