Join us  

SBI, PNB, BOB या बँकेत खाते असणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पुढच्या सहा महिन्यात खात्यात जमा होणार मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 2:07 PM

देशातील सरकारी आणि प्रायव्हेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

पैशाची बचत ही सर्वात मोठी बचत असते. पैशाची बचत करण्यासाठी आपण अनेक मार्गांचा अवलंब करतो. यासाठी आपण एफडी तसेच एसआयपी सारख्या पार्यायांचा वापर करतो, आता देशातील सरकारी आणि प्रायव्हेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआय, पीएनबी आणि बँक ऑफ बडोदा या बँकेसह अन्य बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला ६ महिन्यातच पैसे मिळणार आहेत. सहा महिन्यातच तुम्हाला बँक मोठा फायदा मिळवून देणार आहे.  FD हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तुम्ही मुदत ठेव आता तुम्हाला फक्त १८० दिवसांत चांगले व्याज मिळेल.

देशातील बँकांमध्ये सहा महिन्यांसाठी एफडी करण्याची सुविधा असते. तुम्ही एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँकेत एफडी करु शकता. या बँका चांगले व्याजदर देत आहेत. 

Success Story : दिल्लीच्या ‘गुप्ताजीं’नी कसं बनवलं ‘हवेली राम’ला ‘Havells’, रंजक आहे यशाची कहाणी

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६ महिन्यांची एफडी केली तर बँक सर्वसामान्य नागरिकांना ४.५० टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँक ५ टक्के दराने व्याज देत आहे.

याशिवाय PNB सर्वसामान्य नागरिकांना ६ महिन्यांच्या FD वर ४.५० टक्के दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ५.०० टक्के दराने व्याज देत आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये ६ महिन्यांच्या FD वर ४.५०% व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ५.०० टक्के दराने व्याज मिळणार आहे. तर एचडीएफसी बँक ६ महिन्यांसाठी ४.५० टक्के व्याजदर देत आहे, याशिवाय आयसीआयसीआय बँक ४.७५ टक्के व्याजदर देत आहे. 

टॅग्स :बँकएसबीआयएचडीएफसी