Join us

अलर्ट! SBI, HDFC, ICICI सह देशातील मोठ्या बँका फक्त 4 तासांसाठी उघडणार; 'ही' कामं केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 7:18 PM

Bank New Timing : सरकारी बँकांव्यतिरिक्त आपल्या कर्मचार्‍यांचे जीव वाचवण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,54,96,330 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,67,334 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4529 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,83,248 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान बँकांनी त्यांचे कामाचे तास आता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या कठीण काळात बँक कर्मचारी लोकांची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत सरकारी बँकांव्यतिरिक्त आपल्या कर्मचार्‍यांचे जीव वाचवण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

बहुतेक बँकांनी आपल्या कामकाजाचे तास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मर्यादित केले आहेत. लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन बँका मुख्यत्वे पैसे जमा आणि पैसे काढण्याचे काम करत आहेत. याशिवाय शासकीय काम आणि रेमिटेन्स सेवाही सुरू आहे. भारतीय बँक असोसिएशनने बँकांना दिलेल्या निर्देशानुसार डोअर स्टेप बँकिंग सेवेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या सेवेनुसार बँक आपल्या घरी येऊन तुमची सेवा करणार आहे.

बँकेच्या शाखा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कार्यरत

ट्विटरवर एका युजरने स्टेट बँक ऑफ इंडियाला डीबीटी अकाऊंट लिंक करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्यास सांगितले. यावर एसबीआयने उत्तर दिले की, SLBC च्या सूचनेनुसार यावेळी बँकेच्या शाखा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कार्यरत आहेत. यावेळी बँकेच्या शाखेत केवळ चार सेवा सुरू आहेत. यात पैसे जमा करणे, पैसे काढणे, चेक जमा करणं, ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटी आणि सरकारी सेवेचा समावेश आहे.

बँकेमध्ये होणार फक्त ही चार कामं

एसबीआयने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत आता फक्त 4 कामे होणार आहेत. 

-  पैसे ठेवणे आणि पैसे काढणे-  चेकशी संबंधित काम- डीडी अर्थात डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीशी संबंधित काम- शासकीय चलन

बिहारमध्ये कार्यरत असलेल्या बँक शाखा 31 मेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यरत राहतील. बिहारमधील बँकांनी हा निर्णय घेतला आहे, कारण राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी 31 मेपर्यंत वाढविला आहे. एसबीआय, कॅनरा बँक, पीएनबी, एचडीएफसी बँकेसह सर्व सरकारी आणि खासगी बँक शाखांमध्ये ही वेळ लागू असेल.

कोरोनामुळे या वेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या बाजूने परिस्थिती लक्षात घेऊन राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवर स्थानिक लॉकडाऊन राबविण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत आयबीएच्या व्यवस्थापकीय समितीने राज्यस्तरीय बँकर्स समितीला म्हणजे एसएलबीसीला एक निर्देश जारी केला आहे, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन एसओपीमध्ये आवश्यक ते बदल करता येतील.

एसओपीनुसार बँक आपल्या कर्मचार्‍यांना रोटेशन तत्त्वावर कार्यालयात कॉल करू शकते. याशिवाय गरज भासल्यास ते घरूनही काम करू शकतात. याशिवाय 50 टक्के कर्मचार्‍यांसह रोटेशनल तत्त्वावरही बँका कार्यरत राहू शकतात. याशिवाय बँक कर्मचार्‍यांना लवकरात लवकर लस द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे जवळपास 600 बँकर्सचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत यंदा कोरोनाची नवीन लाट आली, तेव्हा बँक संघटनेने कामासंदर्भात अद्ययावत एसओपी देण्याचे आवाहन केले होते. आयबीएने आपल्या अहवालात बँकिंग क्षेत्रात मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असल्याचं आढळून आलं आहे. एसएलबीसी कन्व्हेयर बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या सदस्य बँकांना केवळ 15 टक्के हजेरी घेऊन हे काम पुढे करण्यास सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :बँककोरोना वायरस बातम्याभारतस्टेट बँक आॅफ इंडियाएचडीएफसीआयसीआयसीआय बँक