Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI, PNB कोणत्या बँकेच्या ATM मधून किती कॅश काढता येईल? जाणून घ्या सविस्तर

SBI, PNB कोणत्या बँकेच्या ATM मधून किती कॅश काढता येईल? जाणून घ्या सविस्तर

atm cash withdrawl limit : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि आयसीआयसीआय बँकेसह (ICICI Bank ) सर्व बँकांमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेगवेगळे नियम आणि मर्यादा आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 03:26 PM2021-08-12T15:26:33+5:302021-08-12T15:30:45+5:30

atm cash withdrawl limit : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि आयसीआयसीआय बँकेसह (ICICI Bank ) सर्व बँकांमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेगवेगळे नियम आणि मर्यादा आहेत. 

sbi pnb icici bank hdfc bank atm cash withdrawl limit check all details here | SBI, PNB कोणत्या बँकेच्या ATM मधून किती कॅश काढता येईल? जाणून घ्या सविस्तर

SBI, PNB कोणत्या बँकेच्या ATM मधून किती कॅश काढता येईल? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : जर तुम्ही एटीएममधून (Bank ATM) कॅश काढणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एटीएममधून कॅश (ATM Transactions Limit) काढण्यासाठी सर्व बँकांचे वेगवेगळे नियम असतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि आयसीआयसीआय बँकेसह (ICICI Bank ) सर्व बँकांमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेगवेगळे नियम आणि मर्यादा आहेत. 

स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममधून तुम्ही दिवसाला किमान 100 रुपये आणि जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेदारांसाठी व्यवहार सोपे करण्यासाठी 18 प्रकारची एटीएम कार्डे प्रदान करते. जनरल एसबीआय/एटीएम कार्डपासून ते परदेशी चलन डेबिट कार्डपर्यंत विविध प्रकारची कार्डे आहेत.

पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये (Punjab National Bank ATM) येताना तुम्ही त्याच्या प्लॅटिनम आणि Rupay डेबिट कार्डद्वारे दिवसाला 50,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. दुसरीकडे, जेव्हा त्याच्या मास्टर डेबिट कार्ड किंवा क्लासिक Rupay कार्डवरून दिवसाला 25,000 रुपये रोख काढू शकता.

आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank)  वेबसाइटनुसार, तुम्ही प्लॅटिनम चिप कार्डद्वारे एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. दुसरीकडे Visa सिग्नेचर डेबिट कार्डद्वारे दीड लाख रुपयापर्यंत पैसे काढू शकता.

एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेच्या HDFC Bank) प्लॅटिनम डेबिट कार्डद्वारे दररोज एक लाख रुपयांची रोख रक्कम काढण्याची परवानगी बँक देते. 

...तर बँकांना दंड ठोठावला जाईल
एटीएममध्ये रोख रक्कम संपल्याप्रकरणी बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय भारतीय रिर्झव्ह बँकेने (आरबीआय) घेतला आहे. ही व्यवस्था 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल. एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे. एटीएममध्ये वेळेत पैसे न टाकल्याने संबंधित बँकेवर 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Web Title: sbi pnb icici bank hdfc bank atm cash withdrawl limit check all details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम