जर तुम्ही घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मोठी संधी घेऊन आली आहे. मेगा ऑक्शनमध्ये तुम्हाला कमी किंमतीत मालमत्ता मिळू शकते. एसबीआय हा मेगा लिलाव 25 ऑक्टोबरला सुरु करणार आहे. यामध्ये व्यावसायिक ते खासगी मालमत्ता खरेदी (Property auction) करण्याची संधी मिळणार आहे. एसबीआयनेच ट्वीट करून याची माहिती दिली आहे.
तुम्ही ऑक्शनमध्ये भाग घेऊन चांगली बोली लावू शकता. गुंतवणूकदार या संधीचा उपयोग घरे, जमीनी, दुकाने बाजारापेक्षा कमी किंमतीत घेण्यासाठी करू शकता, असे एसबीआयने म्हटले आहे. या मालमत्ता कर्ज थकविलेल्या कर्जदारांच्या आहेत. त्या कर्जदारांनी गहाण ठेवल्या होत्या. यामध्ये दुकाने, घरे, इमारती व अन्य गोष्टी आहेत. ज्या कमी दरात खरेदी करता येतील.
Your next big investment opportunity is here! Join us during the e-auction and place your best bid.
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 13, 2021
Know more: https://t.co/vqhLcagoFF#Auction#EAuction#Properties#SBIMegaEAuctionpic.twitter.com/e24yoxgh1C
काय करावे लागेल...
सर्वात आधी तुम्हाला जवळच्या स्टेट बँकेत जाऊन कागदपत्रे दाखल करावी लागतील. यानंतर तुम्हाला ऑक्शनचा युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल. तुमच्या ईमेल आयडीवर तो मिळेल. 25 तारखेला लॉगिन केल्यावर अटी मान्य़ असल्याचे टिक करून सबमिटवर क्लिक करावे लागेल. यानंतर बोलीधारकांना केवायसी, ईएमडी आणि एफआरक्यू जो तुम्हाला बँकेत मिळेल तो अपलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला बोलीची प्रारंभिक रक्कम जमा करावी लागेल. अंतिम बोली लावण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करावे. यानंतर पुन्हा अंतिम सबमिटवर क्लिक करावे. अंतम सबमिट बटन क्लिक न झाल्य़ास तुम्ही लिलावात भाग घेऊ शकणार नाही. अधिक माहितीसाठी बँकेशी संपर्क साधावा.